आजीआजोबा मुलांच्या आयुष्यातील संस्काराचे ज्ञानपीठ:कवयित्री सुरेखा उत्सुर्गे
निलंगा:-आजी आजोबा हे मुलांच्या आयुष्यातील संस्काराचे ज्ञानपीठ आहे.त्यांच्याकडून मिळालेली संस्काराची शिदोरी जीवनात मार्गदर्शक ठरते असे प्रतिपादन कवयित्री उत्सुर्गे यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ, सुहासिनी पाटील होत्या , विद्यार्थ्यांनी त्यांच्या आजी-आजोबांचे, आईचे ,वडिलांचे पूजन करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने कार्यक्रम साजरा केला. विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आजी-आजोबा व नातवंड यांचा सहवास कमी होत चालला आहे. आजी ,आजोबा,आई व वडील हे कुटुंबाचे महत्त्वपूर्ण घटक असून नातवंडांच्या जीवनामध्ये त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजी-आजोबा व नातवंडांचे ऋणानुबंध व जिव्हाळा कायम राहावा, याकरिता अशा प्रकारचा नावीन्यपूर्ण उपक्रम शाळेत आयोजित करण्यात आला होता.
पाश्चात्य संस्कृतीनुसार १४ फेब्रुवारी हा दिवस अनेक ठिकाणी व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र निलंगा येथील डी, के पाटील स्कूलमध्ये या चुकीच्या संस्कृतीला आडफाटा देण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये चांगली संस्कृती व विचार रुजवण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस मातृ, पितृ दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या पालकांना आमंत्रित करुन भारतीय परंपरेनुसार विद्यार्थ्यांकडून मातृ, पितृ पूजन करण्यातआले. तसेच आपल्या जीवनात आईवडील (पालकांचे)महत्त्व काय असते हे विद्यार्थ्यांना सांगुन ते पटवून दिले.विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आईवडील किती महत्त्वाचेआहेत हे समजून घेत असतांना पालकवर्ग, विद्यार्थी विद्यार्थीवर्ग भावूक झाले होते व त्यांच्या डोळ्यात
आनंदाश्रू तरळले होते.याप्रसंगी आपल्या जीवनात आपल्या आईवडिलांचे किती महत्त्व आहे हे जाणून घेतांना विद्यार्थ्यांचे व पालकवर्गाचे डोळे पाणावले होते. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील पालकांचे महत्त्व लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्या आयुष्यात पालकांना सर्वोच्च स्थान देऊन आयुष्यभर ऋणी राहून सन्मानाने वागु अशी प्रतिज्ञा घेतली. शिक्षणासोबतच भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी डी, के पाटील इंग्लिश स्कूलमध्ये सतत सांस्कृतिक व प्रासंगिक कार्यक्रम आयोजित केले जातात व या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाश्चात्य संस्कृतीपासून दूर करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात हे विद्यार्थी जीवनात अत्यंत महत्त्वाचे कार्य या डी, के पाटील इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून केले जाते असेच सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्येक शाळेत घेतले तर नक्कीच आपल्या भावी पिढीला आपल्या संसाराचा अभिमान राहील व ते चारित्र्यसंपन्न जीवन जगतील असे मत पालकांनी व्यक्त केले व तोंडभरून कौतुक करत मनापासून आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीपणे पार पडण्यासाठी वाडीकर महेश, गुरुनाथ मोहोळकर, मडीवाळ गोपाळ, प्रीती जाधव ,चितकुटे संजीवनी,वलांडे सुषमा, सूर्यवंशी अनिल, शेख सर, बरमदे माया, पाटील मधुमती, रेड्डी पुष्पा, पांचाळ मॅम, माने मॅम, पेठकर मॅम, श्रद्धा पाटील व अभय जाधव यांनी परिश्रम घेतले तर कार्यर्माचे सूत्रसंचालन गुरुनाथ मोहोळकर यांनी केले व प्रास्ताविक महेश वाडीकर यांनी केले.
बापाविना पोर , म्हणजे काठीविना वेल!! महेश वाडीकर

या प्रसंगी पालकांना संभोधित करताना उपप्राचार्य महेश वाडीकर म्हणाले की आई आईच असते, हे त्रिकालाबाधित सत्य असले तरी वडील हे वडीलच असतात हेही ब्रह्मसत्य आहे.
आई बाबा या दोन शब्दांचं इतके महत्व आहे आपल्या आयुष्यात कि सांगता येणार नाही,कारण हे फक्त शब्द नाहीयेत तर आपले आयुष्य आहे. आई म्हणजे ती जिने फक्त जन्मचं नाही तर हे आयुष्य दिलं हे विश्व दाखवले,आणि बाबा ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्याला गती दिली असे आई बाबा.