ब्रोनी पब्लिक स्कुलचे वार्षिक स्नेहसम्मेलन
निलंगा : येथील ब्रोनी पब्लिक स्कुलचे वार्षिक स्नेहसम्मेलन दि. 13/02/2024 रोजी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर संस्कृतीक सभागृह येथे उत्साहात पार पडले. विद्याथ्र्यांनीे विविध कलागुणांचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संभाजीराव पाटील निलंगेकर (माजी पालकमंत्री) यांच्या भुभहस्ते करण्यात आले. व या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष श्री बाळासाहेब शिंगाडे, श्री दगडोजीराव सोळुंके, श्री अॅड. नारायणराव सोमवंशी, श्री अखील देशमुख, श्री सौदागर शपीक, श्री मणियार जिलानी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ब्रोनी पब्लिक स्कुलची संचालीका मुमताज शेख मॅडम यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांनी विद्याथ्र्यांचे मार्गदर्शन केले व स्नेहसंम्मेलनामध्ये नृत्य, नाटक, कविता आदि. कलाविष्कार सादर करण्यात आले. सुत्रसंचालन कु, मणियार मोतीयानाज यांनी केले व आभार मुख्याध्यापक कु. अंजुम शेख यांनी व्यक्त केले. सौ. सोनाली कदम, (थेट्टे), कु. मखमुर पटेल, सौ. यशोदा मोरे (धाकडे) सौ. हीना तांबोली इ. शिक्षकवृंदांनी तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कलीम तांबोली, रियाज मणियार, नसीम तांबोली, जुनेद मणियार, उमेज शेख, जीशान मणियार इत्यांदीना परिश्रम घेतले.