• Thu. Aug 14th, 2025

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव निमीत्त लातूर शहरातील वाहतुक मार्गात बदल…..

Byjantaadmin

Feb 17, 2024

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव निमीत्त लातूर शहरातील वाहतुक मार्गात बदल…..

             लातूर शहरात दि.19/02/2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्‍सव असल्‍याने शहरात विविध जयंती समिती व संघटनेतर्फे वाजत-गाजत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्‍सव मिरवणुक काढण्‍यात येते, त्‍यामुळे  सदर परिसरात वाहतुक कोडी निर्माण होऊ नये म्‍हणुन खालील मार्गावरील वाहतुक बंद करणारे व पर्यायी मार्गाने वळविणे आवश्‍यक आहे.

अ) दि.19.02.2024 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 23.00 वाजेपर्यंत मोटार सायकल, थ्री  व्‍हीलर, एस.टी.बसेस, ट्रक,   टेम्‍पेा, टॅक्‍सी, ट्रॅव्‍हल्‍स, मिनीडोअर इ.वाहनाच्‍या वाहतुकीसाठी बंद असणारे मार्ग

1.       पिव्‍हीआर चौक ते एक नंबर कॉर्नर, पाण्‍याची टाकी(संविधान चौक),दयानंद गेट मार्गे छत्रपती शिवाजी     

            महाराज चौक

2.       नविन  रेणापुर नाका ते जुना रेणापुर नाका मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक

3.       राजीव गांधी चौक ते आदर्श कॉलनी,नंदी स्‍टॉप मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक

4.       गंज गोलाई,मुख्‍य बसस्‍थानक,मिनी मार्केट, अशोक हॉटेल मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक

ब) दि.19.02.2024 सकाळी 10.00 ते रात्री 23.00 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

1.       पी.व्‍ही.आर.चौकातून छत्रपती शिवाजी चौक व शहरात येणारे एस.टी.बसेस पी.व्‍ही.आर.चौकातून नविन रेणापुर नाका मार्गे जुना रेणापुर नाका येथील बसस्‍टॅंडचा वापर करतील, बाकी सर्व वाहने रेणापूर नाकाकडे किंवा खाडगाव टि पॉईटमार्गे वाडा हॉटेल किंवा खाडगाव टी पॉईट, साई धाम,अशियाना बंगला,जुना औसा रोडचा वापर करतील.

2.       औसा रोडने शहरात येणा-या एस.टी.बसेस छत्रपती चौक (वाडा हॉटेल) येथुन रिंग रोडने पी.व्‍ही.आर.चौक,नविन रेणापूर नाका ते जुना रेणापुर नाका बसस्‍थानकाचा वापर करतील, तसेच चारचाकी, तीनचाकी व दोन चाकी वाहने जुना औसा रोडवरुन अशियाना बंगला ,साईधाम मार्गे खाडगाव टी पॉईट किंवा नाईक चौक मार्गे सुतमिल रोडचा वापर करतील.

3.       अंबाजोगाई रोडने लातूर शहरात येणा-या एस.टी.बसेस जुना रेणापुर नाका येथील बसस्‍थानकाचा वापर करतील. अंबाजोगाई रोडने येणारी चार चाकी, तीन व दोन चाकी वाहने हि सिध्‍देश्‍वर मंदीराकडील रोड मार्गे गरुड चौकाकडे किंवा गावभागात जातील व जूना रेणापुर नाका येथुन बालाजी मंदीर या मार्गाचा वापर करतील.

4.       नांदेड रोडने शहरात येणा-या एस टी बसेस गरुड चौक,सिध्‍देश्‍वर चौक,नविन रेणापूर नाका मार्गे जुना रेणापुर नाका येथील बसस्‍थानकाचा वापर करतील. नांदेड रोडने येणारे ट्रक, चार चाकी, तीन व दोन चाकी वाहने सिध्‍देश्‍वर मंदीरकडील रोड मार्गे नविन रेणापुर नाका, रेल्‍वे स्‍टेशन मार्गे पी.व्‍ही.आर चौक या मार्गाचा वापर करतील किंवा गरुड चौक,बाभळगाव नाका,म.बस्‍वेश्‍वर चौक मार्गे राजीव गांधी चौक या मार्गाचा वापर करतील.

5.       शहरातील वाहतुकीसाठी 1) राजस्‍थान विद्यालय ते पॅरलल रोडने बेद्रे कॉम्‍प्‍लेक्‍स मागून औसा रोड,अशियाना बंगला ते खाडगाव रोड,रिंगरोडचा 2) गांधी चौक ते बस्‍वेश्‍वर महाविद्यालय ,रमा चित्रपटगृह,खोरी गल्‍ली,शिवनेरी लॉज या मार्गाचाच वापर करतील. जुना रेणापुर नाका बसस्‍थानक येथे येणा-या व जाणा-या सर्व बसेस परत त्याच मार्गे रिंगरोडने जातील.

       तरी सर्व नागरीकांनी दि.19.02.2024 रोजी पर्यायी मार्गाचा वापर करुन वाहतुकीसाठी बंद असलेल्‍या  मार्गावर वाहनांचा वापर टाळून प्रशासनास सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *