• Thu. May 1st, 2025

माकणी येथील मारुती मंदीराच्या विकास कामासाठी निधि कमी पडू देणार नाही-माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची ग्वाही 

Byjantaadmin

Feb 17, 2024

माकणी येथील मारुती मंदीराच्या विकास कामासाठी निधि कमी पडू देणार नाही-माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची ग्वाही 

माकणीत तीर्थ क्षेत्रातून भक्त निवास व विविध विकास कामांचे झाले भूमिपूजन

निलंगा:-माकणी येथील  हनुमान हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे या गावाला दैविशक्ती आहे आता या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा मिळालेला आहे ही विकासाची सुरवात असून या मंदिराला विकास कामासाठी निधि कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली ते निलंगा तालुक्यातील माकणी (थोर) येथील भक्त निवास व विविध विकास कामांचे भूमिपूजन  शुक्रवारी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या  हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते .

यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की मी जिल्हा परिषदेत अध्यक्ष असताना जिल्ह्यातील विविध गावात मंदिराला भेट दिली तिथे विकास कामे करण्याचा प्रयत्न केला परंतु या गावाला भेट देता आली नाही असे सांगून या माकणी थोर येथील हनुमान मंदीराला तीर्थक्षेत्राला ब दर्जा मिळालेला असून विकासाची कामे सुरू झालेली आहेत आगामी काळात अतिशय विकसित झालेले हे माकणी गाव दिसेल याबाबत ग्रामस्थ व भक्तांनी निश्चींत राहावे असे सांगून विकासाला निधि कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली

तत्पूर्वी माकणी थोर येथील हनुमान मंदीरात माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब व सौ सुवर्णाताई देशमुख यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर ग्रामस्थांनी मोठया प्रमाणावर माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांचे स्वागत केले यावेळी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील सौ वनमाला आबासाहेब पाटील माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, विक्रमजी माकणीकर, मधुकरअण्णा माकणीकर,,हनुमान मंदिर समितीचे सचिव परमेश्वर सूर्यवंशी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अँड श्रीपतराव काकडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले उपाध्यक्ष सचिन पाटील, सचिन दाताळ, इंदिरा सूतगिरणीचे चेअरमन बाळासाहेब कदम, निलंगा तालुका काँग्रेस अध्यक्ष विजयकुमार पाटील, अजित माने,माजी जिल्हा परिषद सदस्य चेवले,संभाजी सुळ, संभाजी रेड्डी, आदी मान्यवर भक्तगण मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

मंदिर परिसराची पाहणी बोअर चा शुभारंभ 

यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी मंदीर परिसरातील विविध कामाचा आढावा घेतला व पाहणी केली यावेळी मंदीर परिसरात चेवले बोअरवेल कंपनी लातूर यांच्या वतीने देण्यात आलेल्या बोअरचे पूजन श्रीफळ वाढवून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले बोअर ला पाणी लागले याप्रसंगी दिलीपराव देशमुख सौ सूवर्णाताई दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.तसेच चेवले बोअरवेल कंपनी ने नूतन दोन घेतलेल्या गाड्यांचे पूजन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *