माजीमंत्री आ. अमित देशमुख यांनी लातूर फेन्सिंग (तलवारबाजी) अकॅडमीच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा
लातूर प्रतिनिधी : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर फेन्सिंग (तलवारबाजी) अकॅडमीच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा, खेलो इंडिया स्पर्धा, राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेतील विविध पदक प्राप्त विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून लातूर येथील खेळाडूंना तलवारबाजी खेळण्यासाठी सुवीधा व्हाव्यात यासाठी लातूर फेन्सिंग (तलवारबाजी) अकॅडमीला तलवारबाजीच्या साहित्यासाठी २० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

यावेळी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा. प्रशिक्षक दत्ता गलाले, अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय अहमदपूरचे मुख्याध्यापक तथा सहायक प्रशिक्षक प्रशांत माने, खेळाडू सुवर्ण पदक विजेती माही आरदवाड, सुवर्ण पदक विजेती जान्हवी जाधव, वैभवी माने, रोहीणी पाटील, दिव्यांका कदम, स्नेहा कश्यप, सुरज कदम, भाऊराव कदम आदी उपस्थित होते.