• Thu. May 1st, 2025

‘सर्फराज खानच्या वडिलांना द्यायचंय लाखोंचं गिफ्ट’, आनंद महिंद्रा यांचं ट्विट व्हायरल

Byjantaadmin

Feb 16, 2024

गेली अनेक वर्ष डोमॅस्टिक क्रिकेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करत असलेल्या सर्फराज खानला अखेर भारतीय संघात स्थान मिळालं. अन् त्यानं देखील ही सुवर्णसंधी वाया जाऊ दिली नाही. पहिल्याच मॅचमध्ये तडाखेबाज अर्धशतक झळकावून आपली पात्रता सिद्ध केली. बरं तो ज्या पद्धतीनं बॅटिंग करत होता ती पाहाता जर रविंद्र जडेजानं त्याला रनआऊट केलं नसतं तर नक्कीच त्यानं पहिलं शकत पाहायला मिळालं असतं. पण त्याच्या ६२ धावांच्या खेळीवर देखील प्रचंड कौतुकाचा वर्षाव झाला. अगदी प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी देखील सर्फराजचं कौतुक करत त्याच्या वडिलांना एक खास गिफ्ट देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. चला तर मग पाहूया महिंद्रा कुठलं गिफ्ट देऊ इच्छित आहेत. (फोटो सौजन्य – @anandmahindra/Twitter)

आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते अनेकदा तरुणांसाठी मोटिव्हेशनल व्हिडीओ शेअर करतात. पण यावेळी त्यांनी सर्फराज खानचा व्हिडीओ शेअर करत त्याच्या वडिलांचं कौतुक केलं आहे. सर्फराजचे वडील नौशाद खान हे स्वत: देखील क्रिकेटपटू होते. त्यांनीच सर्फराजला ट्रेन केलं आहे. सातत्यानं चांगली कामगिरी करून देखील टीममध्ये स्थान मिळत नसल्यामुळे सरफराज नाराज होता. पण वडिलांनी कधी त्याची हिम्मत तुटू दिली नाही. त्याला नैराश्येत जाऊ दिलं नाही. ते कायम त्याला प्रेरणा देत राहिले. अन् त्यामुळेच आज सर्फराज चांगली कामगिरी करू शकला. अन् त्यामुळे महिंद्रांनी वडिलांवर कौतुकाचा वर्षाव करत त्यांना थेट महिंद्रा थार देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (फोटो सौजन्य – @anandmahindra/Twitter)

हे ट्विट होतंय व्हायरल

काय म्हणाले आनंद महिंद्रा?

काय म्हणाले आनंद महिंद्रा?

“धीर सोडू नकोस, बस्स! कठोर परिश्रम, धैर्य आणि संयम… वडील आपल्या मुलाला प्रेरणा देण्यासाठी काय करू शकतात? याचं हे ताजं उदाहरण आहे. नौशाद खान हे स्वत: एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी आमच्याकडून थार ही गाडी भेट म्हणून स्विकारावी ही विनंती.” अशा आशयाचं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या व्हायरल होत असून नेटकरी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *