• Fri. May 2nd, 2025

मी आहे तिथे ठीक आहे, सिंहासनाच्या खेचाखेचीत मला रस नाही- माजी मंत्री आमदार अमित देशमुख

Byjantaadmin

Feb 16, 2024

मी आहे तिथे ठीक आहे, सिंहासनाच्या खेचाखेचीत मला रस नाही- माजी मंत्री आमदार अमित देशमुख

सत्ताधारी गटात येण्याच्या आवाहनाला माजी मंत्री आमदार अमित देशमुख
यांचे सडेतोड उत्तर

 लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल चा शानदार शुभारंभ

लातूर (प्रतिनिधी): मी आहे तिथे ठीक आहे, सिंहासनाच्या खेचाखेचीत मला रस नाही, असे स्पष्ट करून तुम्ही सुखी समाधानी रहा आणि संपन्न बना अशा शब्दात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे आणि भाजपचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी सत्ताधारी गटात येण्यासंबंधित केलेल्या आवाहनाला बगल दिली, महाराष्ट्र शासन, विलासराव देशमुख फाउंडेशन, पुणे फिल्म फाउंडेशन आणि अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे आयोजित केलेल्या लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा गुरुवारी थाटामाटात शुभारंभ झाला. या उद्घाटन समारंभात माजी मंत्री अमित विलासराव देशमुख बोलत होते,




या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे अध्यक्ष व ख्यातनाम दिग्दर्शक जब्बार पटेल, समर नखाते, लातूरचे खा.सुधाकर शृंगारे, आ.विक्रम काळे या लोकप्रतिनिधीसह लातूरच्या जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिनीनर्हे-विरोळे, विशाल शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपस्तीत होते. याप्रसंगी बोलताना आपल्या खुमासदार शैलीत आमदार अमित देशमुख यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक पुणे फिल्म फेस्टिवलचे सर्वेसर्वा जब्बार पटेल यांच्या सिंहासन या चित्रपटातील कथानकाचा खुबीने उल्लेख केला, त्याला अनुसरूनच सध्याच्या राजकीय घडामोडीचा संदर्भ त्यांनी दिला, प्रारंभी बोलताना आमदार विक्रम काळे आणि खासदार सुधाकर शृंगारे यांनी आमदार अमित देशमुख यांना सत्ताधारी गटात
येण्याचे आवाहन केले होते, मी सध्या आहे तिथे ठीक आहे मला सिंहासन खेचाखेची मध्ये रस नाही, असे सांगून उभयतांना त्यानी तुम्ही  समाधान रहा आणि संपन्न व्हा असा सल्ला दिला,




चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या सूचनेनुसार आगामी वर्षात , मराठी चित्रपट सृष्टीत नव्याने येणाऱ्या कलाकाराचा या लातूर फिल्म फेस्टिवल मध्ये  सत्कार करण्यात येईल, देशभरात गाजलेल्या विविध भाषेतील चित्रपट कलावंतना येथे बोलवून त्यांचाही सन्मान करण्यात येईल, जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटही येथे दाखवले जातील शिवाय शॉर्ट फिल्म फेस्टिवल ही पुढच्यावर्षी पासुन सुरुकरु अशी ग्वाही आमदार देशमुख यांनी यावेळी दिली, ‘जे जे नव तेथे लातूरला हवं’ हा वारसा पुढे चालवला जाईल नव्या नव्या गोष्टी लातूरमध्ये आणल्या जातील त्या माध्यमातून येथील नवतरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत होण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील  अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी बोलताना दिली. यावेळी बोलताना जब्बार पटेल म्हणाले की, लातुर हे रसिक शहर आहे यामुळे या ठिकाणी नाटक,सिनेमा रुजला पाहिजे वाढला पाहिजे या करिता असे चित्रपट महोत्सव येथे सातत्याने व्हावेत. या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून या
ठिकाणी आलेल्या सिने रसिकांना पाहता या महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. या महोत्सवातील स्थळ चित्रपट महिला भगिनींनी आवर्जून पाहावा असे आवाहन त्यांनी करुण माजी मुख्यमंत्री आदरणीय लोकनेते विलासराव  देशमुख यांच्या आनेख अठवणिना उजाळा दिला.


यावेळी बोलताना आमदार विक्रम काळे म्हणाले की, जे नवं ते लातूरला हवं हे आपल्याला आदरणीय विलासराव देशमुख यांनी सांगितलं तेव्हा पासून आजतागायत आदरणीय साहेबांचा हा धागा पकडून आपण पुढे जातोय. या चित्रपट महोत्सवात अत्यंत चांगल्या चित्रपटाची पर्वणी लातुर वासीयांना मिळणार आहे याचा मनमुराद आनंद सिने रसिकांनी लुटावा असे म्हणत या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.



यावेळी बोलताना खा.सुधाकर शृंगारे म्हणाले की, लातुर मधील या फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहण्याचा आज योग आला हा माझा पहिलाच फ़िल्म फेस्टिव्हल कार्यक्रम आहे. असे महोत्सव लातुर मध्ये होत राहावे ज्यामुळे नवोदित कलावंतांना प्रेरणा मिळेल. आसे ते म्हणाले. याप्रसंगी लातुर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड.किरण जाधव,ट्वेन्टी वन शुगर्स व्हा.चेअरमन विजय देशमुख, ऍड.दीपक सुळ, ऍड.समद पटेल, गणेश एस.आर.देशमुख, जितेंद्र पाटील, डॉ.एम.जी.बुके, सुभाष घोडके, प्रा.प्रवीणकांबळे, आसिफ बागवान, धनंजय शेळके, पंडीत कावळे, विकास कांबळे, बाळकृष्ण धायगुडे,सुपर्ण जगताप,व्यंकटेश पुरी,इम्रान सय्यद,युनुस मोमीन, प्रा.बी.एस.वाकुरे,ऐश्वर्या पाटील यांच्यासह विलासराव देशमुख फाउंडेशन सदस्य व विलास को. ऑप.बँक संचालक, सिनेरसिक,पत्रकार, नागरीक मोठया संखेने उपस्थित होते. या वेळी प्रास्तविक करताना अभिजात फिल्म सोसायटीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी फिल्म सोसायटीची सुरुवात ते आजतागायत केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विश्वास
शेंबेकर व अंजली टेंभुर्णीकर यांनी केले तर सेवटी अभार विलास को.ऑपरेटीव्ह बँकेचे संचालक व्यंकटेश पुरी यांनी मानले. लातूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल चे उद्घाटन समारंभानंतर बल्गेरियन
चित्रपट ‘ब्लागाज लेसन’ या चित्रपटाने करण्यात आले. सायबर क्राईम, वृद्धांच्या समस्या तसेच मानवी जीवनातील परंपरा शरणता यावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले होते.

या महोत्सवातील दुसरा मराठी चित्रपट सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ हा असून या संपूर्ण महोत्सवात येत्या तीन दिवसांत ग्लोबल सिनेमा विभागात युरोपियन, उत्तर अमेरिका, पश्चिम आशिया व आशियाई देशांमधील विविध भाषांमधील रोपवॉकर मेमरीज (इराण- दिग्दर्शक हमीद राजाबी), फूटप्रिंटस ऑन वॉटर (युके- भारत- दि. नतालिया शाम), सिरा (बुर्किनाफासो -फ्रान्स- जर्मनी -सेनेगल – दिग्दर्शक ॲपोलाईन ट्राओरे), द चेंबरमेड (स्लोव्हाकिया- झेक रिपब्लिक – दि. मारियाना एंजल), टोटेम (मेक्सिको- दि. लीला एव्हिलेस), द पाथ ऑफ एक्सलन्स (फ्रान्स दि. फ्रेडरिक मर्माऊड), सिस्टर एंड सिस्टर (पनामा –  दि. कटिया झुनीगा), अकिलिस ( इराण – दि. फरहाद देलाराम), अ रोड टू अ व्हिलेज ( नेपाळ – दिग्दर्शक नबीन सुब्बा), सौला (अल्जेरिया- दिग्दर्शक सलाह इसाद), वुमन ऑन द रूफ (पोलंड – दि. ॲना जडोस्का), ऑल दि सायलेन्स (मेक्सिको – दि.  दिएगो देल रियो), एक्सकर्शन (बोस्निया- हर्जेगोविना- क्रोएशिया -दि. उना गुंजक), दि रे हॉर्न (स्पेन, बेल्जियम दि. जयोने कंबोर्डा), व्हाइट प्लास्टिक स्काय (हंगेरी, ॲनिमेशन
फिल्म,) अ सेन्सेटिव्ह पर्सन(झेक रिपब्लिक दि. टॉमस क्लेन)

सोळा चित्रपट तर भारतीय चित्रपट विभागात तमिळ भाषेतील दोन, मल्याळम भाषेतील एक व बंगाली भाषेतील एक असे एकूण चार चित्रपट,तामिळ बंडखोरांचा प्रश्न हाताळनाऱ्या ‘लिबरेशन पार्ट वन’ तसेच द गोल्डन थ्रेड (दिग्दर्शिका- निष्ठा जैन), व अंटार्टिका कॉलिंग (दि. ल्यूक जॅकेट) या दोन डॉक्युमेंटरीज आहेत.वरील चित्रपटासह एकूण २५ चित्रपट या चार दिवसाच्या महोत्सवात दाखवले जाणार असून रविवार दि.१८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता टॉमस क्लेन दिग्दर्शित ‘अ सेन्सेटिव्ह पर्सन’ या झेक चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *