संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना गावात जाऊन लाभ प्रमाणपत्र वाटप, शासन आपल्या दारी उपक्रमातून अभिनव प्रयोग
निलंगा :- शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थ्यांना प्रत्यक्ष गावात जाऊन लाभ प्रमाणपत्राचे वाटप करणारी ही पहिलीच संजय गांधी निराधार कमिटी आहे. या माध्यमातून त्यांनी एक अभिनव व लोक उपयोगी उपक्रम चालू केला आहे. निलंगा तालुक्यात अनेक दिवसां पासून संजय गांधी स्वावलंबन योजनेची कमिटी अस्तित्वात नसल्यामुळे हजारो गरजू लाभार्थी लाभाच्या प्रतीक्षेत होते, माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्र्यांनी ही समिती गठीत करतात समितीचे अध्यक्ष शेषराव ममाळे यांनी तातडीची बैठक बोलावून 2400 पेक्षा जास्त अर्जाची छाननी करून 1700 लाभार्थ्याचे अर्ज मंजूर करण्यात आले अनुदानाच्या प्रतिशत असलेल्या लाभार्थ्यांना शासन आपल्या दारी मोहिमेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याची भेट घेऊन अनेक गावात जाऊन लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले.

निलंगा तालुक्याच्या इतिहासात ही पहिलीच संजय गांधी स्वावलंबन कमिटी आहे.अरविंद पाटील निलंगेकर यांच्या सुचनेनुसार गावात जाऊन प्रत्यक्ष लाभार्थ्याची भेट घेऊन लाभ मिळाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले, यावेळी निलंगा तालुका संगायोचे अध्यक्ष शेषराव ममाळे सदस्य किशोर लंगोटे उत्तम (आण्णा) लासोने,रवि कांबळे,अमृत बसवदे, उपसरपंच रोहित पाटील,भाजपाचे जेष्ठ नेते व्यंकट धुमाळ,सौरभ धुमाळ,वीरभद्र स्वामी, पाशामियाँ आत्तार, प्रदीप पाटील , सुमित इनानी ,सह स्थानिक सरपंच, उपसरपंच, भाजपा बूथ प्रमुख व भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते,