संत श्री सेवालाल महाराज याची २८५ वी जयंती उत्साहात साजरी…
लाला पटेल यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम
निलंगा/प्रतिनिधी
निलंगा शहरासह दापका राठोडा लांबोटा केळगाव येथे काँग्रेसचे नेते लाला पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सामाजिक कार्यक्रम घेत श्री संत सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली आहे.

दापका तांडा ते निलंगा शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन जयंती उत्सव समितीने मोटार सायकल रॕली काढून जय सेवालाल च्या घोषणा देत मोठ्या उत्साहाने महिला पुरूषासह वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
यावेळी काँग्रेसचे नेते लाला पटेल (तालुका अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्यांक सेल निलंगा दयानंद चोपणे,विलास माने, ग्रामपंचायत सदस्य दत्ता राठोड, बबर पठाण (तंटामुक्त अध्यक्ष दापका), बबलु जाधव (ग्रामपंचायत सदस्य दापका),नाईक देवीचंद राठोड, कारभारी शिवाजी पवार,पुजारी कनिराम राठोड,जयंती अध्यक्ष सुधाकर राठोड, विकास आडे, सुजीत राठोड,पवन आडे,अरून राठोड, अनिकेत पवार,किरण राठोड,सतिष राठोड, गणेश चव्हाण, दिनेश जाधव, विनोद राठोड, कैलास आडे, अर्जुन राठोड, नितीन जाधव, मारुती जाधव, बबलु राठोड, विशाल राठोड,करण पवार, विनोद आडे, दिनेश आडे, हणमंत राठोड,राहुल राठोड, राहुल पवार, यांच्यासह अनेक महिला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.