सगे सोयऱ्याच्या अध्यादेशासाठी निलंगा शहरासह तालुक्यात कडकडीत बंद
निलंगा/प्रतिनिधी
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे सगे सोयरे कायदा अधिवेश घेऊन पारित करावा या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती गंभीर होत असून उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. तसेच हैद्राबाद गॅझेट,बॉम्बे गॅझेट, सातारा संस्थानचे गॅझेट व महाराष्ट्रभर मराठा आरक्षण संदर्भात दाखल करण्यात आलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आला आहे.दि.१४ फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजच्या वतीने निलंगा तालुक्यातील सर्व शैक्षणिक तसेच सर्व आस्थापना बंदचे पाळण्यात आला.तरी सर्व व्यापारी बांधवांनी आणि शैक्षणिक संस्था तसेच सर्व खाजगी आस्थापना यांनी बंद मध्ये सहभाग नोंदवला.सकळ मराठा समाज बांधवांच्या वतीने उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले
