सोयाबीन दरवाढी साठी निलंगा येथे कॉंग्रेस चे महाआरती
निलंगा : सन २०१४ मध्ये ५ हजाराच्या वरती असलेला सोयाबीनचा भाव आज ४ हजारावर आला आहे. दहा वर्षात शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च दुप्पट झाला अन भाव मात्र कमी झाला अशी परिस्थिती सरकारच्या धोरणामुळे निर्माण झाली आहे. शेतकरी आणि विरोधी पक्षाचा आवाज सरकार ऐकत नसल्याने किमान प्रभू श्रीरामांनी सरकारला जाग आणावी यासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज काॅग्रेसच्या वतीने श्रीरामाची महाआरती करण्यात आली.

मागच्या तीन वर्षापासून चांगला भाव आला कि सोयाबीन विक्री करु असा बेत शेतकऱ्यांनी घातला असून दिवसेंदिवस दर कमी होत चालल्याने एकप्रकारे शेतकऱ्यांच्या जीवनात नैराश्य निर्माण होऊन तो आत्महत्याचा विचार त्यांच्या डोक्यात येत आहे. किमान आम्ही प्रभू श्रीराम च्या पुढे तरी आम्हची मागणी मांडू यासाठी काॅग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या पुढाकारातून महाआरती करण्यात आली. शेतकरी दाम्पत्य तानाजी डोके, नंदाबाई डोके, उमाकांत भंडारे व राजश्री भंडारे यांच्या हस्ते मंत्रोच्चाराने आरती करण्यात आली. यावेळी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद भातांब्रे, माजी प.स सभापती अजित माने, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शिरुर-अनंतपाळचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, देवणीचे तालुकाध्यक्ष अॅड अजित बेलकोणे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, लाला पटेल, शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, हमीद शेख, प्रा दयानंद चोपणे, प्रा रमेश मदरसे, छावाचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके, बालाजी वळसांगवीकर, अजित निंबाळकर, अॅड नारायण सोमवंशी, गोविंद सूर्यवंशी, महेश देशमुख, गंगाधर चव्हाण, प्रमोद मरूरे, मदन बिरादार, मुजीब सौदागर, अॅड तिरुपती शिंदे अदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते