राजवर्धन मोघे व हर्षवर्धन मोघे यांची राज्य स्पर्धेसाठी निवड
निलंगा:-अमरावती येथे दिनांक 11 ,12, आणि 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य ,पुणे यांच्यातर्फे राज्यस्तरीय शालेय मॉडर्न pentathlon स्पर्धेसाठी दयानंद विज्ञान महाविद्यालय ,लातूर येथील राजवर्धन गोपाळ मोघे व पोतदार स्कूल, लातूर येथे शिक्षण घेणारा हर्षवर्धन गोपाळ मोघे या दोन्ही विद्यार्थ्यांची निवड अनुक्रमे 19 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील मुले या गटासाठी झालेली आहे. नुकत्याच तुळजापूर येथे झालेल्या शालेय विभाग स्तर स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील गटांमध्ये राजवर्धन याने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर 17 वर्षाखालील गटांमध्ये हर्षवर्धन यांने चौथा क्रमांक प्राप्त केला.त्यामुळे अमरावती येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी या दोघांची निवड झालेली आहे या स्पर्धेमध्ये 1500 मीटर धावणे, 200 मीटर जलतरण व पंधराशे मीटर धावणे असा 19 वर्षाखालील मुलासाठी क्रम आहे तर 800 मीटर रनिंग 200 मीटर स्विमिंग परत 800 मीटर रनिंग असा सतरा वर्षाखालील मुलांसाठी चा क्रम आहे .

नुकत्याच या दोन्ही मुलांनी पुणे येथील शिवछत्रपतीक्रीडांनगरी, बालेवाडी ,पुणे येथे झालेल्या शालेय राज्यस्तर जलतरण स्पर्धेमध्ये अनुक्रमे 19 वर्षाखालील व 14 वर्षाखाली गटांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले होते.निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय येथील क्रीडा संचालक, प्रा.डॉ.गोपाळ मोघे यांचे हे दोन्ही मुले आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे ,लातूर येथील क्रीडा अधिकारी श्री लटके तसेच उस्मानाबाद येथील क्रीडा अधिकारी श्री नाईकवाडे तसेच क्रीडा अधिकारी चंद्रकांत लोदगेकर क्रीडा अधिकारी श्री जयराज मुंडे ,श्री कृष्णा केंद्रे ,तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे यांनी अभिनंदन केले आहे.