निलंगा(प्रतिनिधी):-वाहतूक नियम माेडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा बेशिस्त चालकांमुळे वाहतूक कोंडी, तसेच अपघातांचे धाेके वाढले आहेत. विशेषत: बुलेटच्या सायलेन्सरमध्ये मॉडिफाइड करून कर्णकर्कश आवाज करीत फिरणाऱ्या बुलेटस्वारांची संख्या वाढत आहे.यातून ध्वनी प्रदूषणही माेठ्या प्रमाणावर हाेत आहे. त्यामुळे निलंगा पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सायलेन्सरमध्ये मॉडिफाइड करून कर्णकर्कश आवाज कराल तर खबरदार, असा इशारा पोलिस नेहमीच देत असते. आता पोलीस ॲक्शन मोडवर येण्याची गरज आहे, विविध प्रकारचे नियमभंग करणाऱ्यावर कारवाईची मोहीम हाती घेण्यात यावी अशी मागणी होत आहे.
शाळा, महाविद्यालये, रुग्णालय परिसरातून जात असताना याचा सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच, ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ होते. या सर्व पार्श्वभूमीवर निलंगा पोलिस यांनी शहरात विशेष मोहीम राबून. यामध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवर वाहनाच्या चालकांवर कारवाई करावी. तसेच मोठ्या आवाजात वाहनाहमध्ये विशेषता ऑटो रिक्षा मध्ये वाजविण्यात येणारे टेप रेकॉर्ड वर सुद्धा कारवाई ची आवशकता आहे.