लातुर:-स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने शहीद टिपू सुल्तान यांच्या जयंती निमित्त शहीद टिपू सुलतान याचे जीवन चरित्र या विषयावार निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये शहरातील २५ शाळांनी सहभाग नोंदवला होता प्रत्येकी शाळेतील आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला,यामध्ये प्रथम बक्षीस सायकल,द्वितीय बक्षीस टॅब , तृतीय बक्षीस स्कूल बॅग आणि सहभाग नेंदवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला जवळ्पाल १०० हुन अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश आर.वाय. शेख होते तर उद्घाटक वसमत चे आमदार राजू भय्या नवघरे होते,प्रमुख उपस्थिती अभिजित देशमुख,मोहसीन खान,डॉक्टर उदगीरकर,अनिस पटेल,अफजल कुरेशी फय्याज वडगेरा,ताज शेख,साहेब अली सौदागर,मशायक शेख ,नुसरत कादरी,हामिद खान होते.कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अब्बास सर,मुस्तफा सर,डॉक्टर मुस्ताक सय्यद ,कासार सर,शादूल शेख,शेख फेरोज,वासिम खान,सय्यद बिलाल,इम्रान मणियार,हाफिज पठाण प्रयत्न केले.