मंगेशकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची राष्ट्रपती भवनास भेट
औराद शहाजानी :- येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालया च्यावतीने आयोजित शैक्षणिक अभ्यास सहलीत सहभागी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवनातील मुख्य इमारत व अमृत उद्यानास भेट देऊन अभ्यास व पाहणी केली. दि.०५ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत नांदेड, आगरा, मथूरा, नवी दिल्ली व नागपूर येथे शैक्षणिक अभ्यास सहल आयोजित करण्यात आली. सदर सहलीत नांदेड येथील श्री.सचखंड हुजूरसाहिब गुरुद्वारा, आगरा येथील ताजमहाल, मथूरा-वृंदावन येथील श्री.राधाकृष्ण प्रेममंदिर, नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन, लाल किल्ला, जामा मस्जिद, इंडिया गेट, श्री शीसगंज गुरुद्वारा, चांदणी चौक आणि नागपूर येथील दीक्षाभूमी इत्यादी सुप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांसह स्थानिक बाजारपेठांना भेटी देण्यात आल्या. सोबतच विद्यार्थ्यांनी नवी दिल्ली येथे अत्याधुनिक मेट्रो रेल्वेतून प्रवासाचा आनंद व अनुभव घेतला. बी.ए., बी.काॅम. व बी.सी.ए. विद्याशाखेतील दिया शर्मा, हर्षदा कणसे, यशोदा भंडारे, तमन्ना पटेल, सना शेरीकर, अल्फिया बडूरे, सानिया मुल्ला, सुजैन मुल्ला, शुभांगी पाटील, शुभांगी कांबळे, मयूरी कांबळे, शिवनंदा कांबळे, सागरबाई बडगे, दीक्षा नावदगे, राधा शिंदे, शिल्पा सूर्यवंशी, अनिकेत सूर्यवंशी, अनमोल सूर्यवंशी, श्रीयश बिरादार, भागवत बिरादार, यासीन शेख, धनराज निंगाले, गहिनीनाथ मोरे, कुणाल कांबळे, देवानंद रामतीर्थे अशा एकूण २५ विद्यार्थ्यांनी प्रस्तुत शैक्षणिक अभ्यास सहलीत सहभाग घेतला. सहलीच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डाॅ.प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात सहलप्रमुख डॉ.सचिन हंचाटे, प्रो.मोहन बंडे, डॉ.शंकर कल्याणे, डाॅ.अशोक नारनवरे, डाॅ.सुचिता किडीले, डाॅ.शीतल गुंजटे यांनी परिश्रम घेतले. शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बस्वराज वलांडे, सचिव रमेश बगदुरे, उपसचिव राजेश वलांडे, सर्व संचालक मंडळाने शैक्षणिक सहलीच्या उपक्रमाचे कौतुक केले.

आमच्या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजतागायत शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनास भेट देऊन केलेली पाहणी व अभ्यास ही बाब अविस्मरणीय व अभिमानास्पद आहे. सहलीतील सहभागी विद्यार्थी व त्यांना प्रोत्साहन देणारे पालक, महाविद्यालय प्रशासन व सहल विभाग यांचे मनस्वी अभिनंदन. – बस्वराज वलांडे, अध्यक्ष, शारदोपासक शिक्षण संस्था, औराद शहाजानी.
आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माफक दरात नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनासह विविध ठिकाणी भेटी देण्यासाठी सहलीचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन. – प्रताप भंडारे, पालक.