मुंबई:-आपल्या नाराज आमदारांना महामंडळे आणि मंत्रिपदाचा दर्जा देऊन शांत करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. यामुळे नागपूर येथे १९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही, याची उत्सुकता आहे.
मुख्यमंत्री शिंदे व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात शुक्रवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार व महामंडळांवर चर्चा झाली. महामंडळ वाटपात भाजपला ६०%, तर शिंदे गटाला ४०% असे सूत्र ठरले आहे. मंत्रिमंडळात शिंदे गट व भाजपचे ९-९ कॅबिनेट मंत्री आहेत.
पहिल्या टप्प्यात ६० मंडळांचे वाटप राज्यात ५२ महामंडळांसह १२० मंडळे आहेत. पहिल्या टप्प्यात ६० मंडळांचे वाटप होईल. यापैकी ३६ च्या आसपास मंडळे भाजपला, तर २४ मंडळे शिंदे गटाला मिळू शकतात. { मविआ सरकारने अडीच वर्षांच्या कालावधीत महामंडळावर नियुक्त्या केल्या नव्हत्या. शिंदे सरकारमध्ये नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळ नियुक्त्या होऊ शकतात.