स्नेहसंमेलनाचे दिवस काळजात जपून ठेवा – अभिनेता किरण माने
निलंगा (प्रतिनिधी )महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन व विदयार्थी परिषदेचे उदघाटन प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव, बब्रुवान सरतापे हे होते.
स्नेहसंमेलनाच्या उदघाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी आपल्या सातारी भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्नेहसंमेलनाचे दिवस काळजात कोरून ठेवण्यासारखे असतात. विद्यार्थ्यांनी हे दिवस कायम जपून ठेवले पाहिजेत. कलेचा स्पर्शाने आयुष्याचे सोने होते. कला माणसाला माणूस बनविते, कलाकारांनी आपल्या कलेतून समाजाची जाण ठेवायला हवी. मानवता सर्वात मोठा धर्म आहे. त्यामुळे माणसानं माणसांवर प्रेम करायला हवं. अश्या पद्धतीने मार्गदर्शन केले व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर वर्तमान काळ आणि भविष्य काळ फार कठीण आहे. सगळीकडे अंधानुकिकरण सुरु आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील अंधानुकीकरना विरोधात मी निर्भीड पणे आवाज उठवल्यामुळे मला मालिकेतून काढून टाकण्यात आले. हे सांगताना गाव सारा झटला पर किरण माने नाही हटला विपरीत प्रतिकूल परिस्थिती असताना भूमिका घेऊन,चिकित्सक व बुद्धीप्रामान्य वादी होण्यासाठी विदयार्थ्यांनी खुप वाचन केले पाहिजे.वाचनातूनच विद्यार्थ्याचा बुद्धिप्रमाण्यवादी प्रवास सुरु होतो. ग्रामीण भागातील विदयार्थ्यांनी भाषेच्या बाबतीतील न्यूनगंड काडून टाकून आपल्या बोली भाषेतूनच आपले व्यक्तिमत्व घडवावे. असे महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.स्नेहसंमेलन झाल्यावर किरण माने यांना विद्यार्थ्यांनी सेल्फी घेण्यासाठी गराडा घातला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. कोलपूके सरांनी स्वागत पर मनोगतातून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवतेसंबंधी माहिती दिली.विचारपीठावर उपस्थित विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख तथा स्नेहसंमेलनाचे प्रभारी प्राध्यापक, डॉ. हंसराज भोसले यांनी प्रास्ताविक पर भूमिका आणि अभिनेता किरण माने यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.

यावेळी गुणवता हमी कक्षाचे समन्वयक,डॉ.ज्ञानेश्वर चौधरी,सांस्कृतिक विभागाचे डॉ. जी जी. शिवसेट्टे, क्रीडा संचालक डॉ. गोपाळ मोघे, रासेयोविभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. डॉ. एस. जी. बेंजलवार, एन. सी सी चे डॉ. सचिन बसुदे विद्यार्थी परिषदेचेपदाधिकारी अध्यक्ष गुमटे आरती, सचिव रेवते प्रियंका, उपाद्यक्ष जाधव वैभवी, आणि सहसचिव, मुगळे अर्पिता.उपस्तित होतं. स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन, कमल गोमसाळे व सरस्वती लंगोटे या विद्यार्थिनीने केले तर आभार डॉ. एस. जी. बेंजलवार यांनी मानले.