• Mon. May 5th, 2025

शेतकऱ्यानी केलेले  ऋण कधीच फिटणार नाहीत -माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकराचे मत

Byjantaadmin

Feb 9, 2024

निलंगा,   : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या ऊस कारखानदारीच्या वजनाचे माप असो यामध्ये काटा मारून माप करणे म्हणजे महापाप असून शेतकऱ्यांच्या निष्पाप विश्वासाला तडा जाऊ देऊ नका .निलंगा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी शेतमजूर महिला जनतेनी गेल्या 20 वर्षा पासून  आमच्यावर मतदानरुपी आशीर्वाद देऊन खूप मोठे उपकार केले आहेत त्यांचे ऋण कधीच फिटणार नाहीत असे मत माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शुक्रवारी दि.9  रोजी व्यक्त केले. 

कर्मयोगी डाॕ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंती निमित्त निलंगा कृषि उत्पन्न बाजार समितीकडून शेतकरी व व्यापारी मेळाव्याचे आयोजन केले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एस.व्ही, बदनाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस .व्ही, लाडके, विभागीय कृषी विस्तार विद्यावेता प्रा.अरुण गुट्टे ,एम.डी. एम.अग्रोचे व्यवस्थापक अमोल धवन, सभापती शिवकुमार चिंचनसुरे, नरसिंग बिरादार, उपसभापती लालासाहेब देशमुख, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे,शाहूराज थेटे यासह आदी उपस्थित होते.

यावेळी संभाजीराव पाटील म्हणाले की, राज्यातील बाजार समित्याचा विकास साधण्यासाठी व पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी दहा कोटी रूपयाचा निधी शासनाने मंजूर केला असून शेतकऱ्यांना बळ देणारी बाजार समिती निर्माण करावी असे अवाहन करून राज्यातील कारखाण्याचे गाळप यंदा पाण्याच्या टंचाईमुळे लवकर सुरू करावे असा आग्रह धरल्यामुळे शासनाने 20 नोव्हेंबर ऐवजी 01 नोव्हेंबर रोजीपासून गाळप सुरू करण्यासाठी परवानगी दिली तरीही आज मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप सर्वच कारखाने करत असले तरी ऊस लागवड अधिक असल्याने ऊस शिल्लक राहण्याची भिती त्यांनी व्यक्त केली. गेल्या तेविस वर्षाच्या राजकारणात मोठे करण्याचे काम या भागातील शेतकऱ्यांनी व मतदारांनी केले असून आम्हाला खुप मोठे केले आहे. त्यांचे ऋण आम्ही अथवा आमचे कुटूंब कदापी फेडू शकत नाही. शेतकऱ्यांनी शेतामध्ये अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पादन वाढवावे त्यांच्या मापात पाप करण्याचा प्रयत्न करू नका लातूर जिल्ह्याला पाण्याची गरज असून जिल्हा पाणीदार करणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.आठ महीण्यापूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकी बाबद बोलताना  माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले. बाजार समिती निवडणुकीत भाजपामध्येच दोन गट पडले होते अरविंद पाटील निलंगेकर यांनी स्वतःच्या नावाने पॕनल करून मतदारासमोर गेले. आमचा कोणत्याही परस्थितीत पराभव झालाच पाहीजे म्हणून लातूरवरून खास ताकद निलंग्यात लावली गेली केवळ मला निलंग्यात रोखून पराभव करणे हाच त्यांचा उद्देश व दिवा स्वप्न होते. असा टोला त्यांनी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे नाव न घेता लगावला. शिवाय मतदारांनी आम्हाला अशिर्वाद देऊन लातूर पेक्षा अधिकृ मताने निवडून दिले त्यामुळे या जनतेचे किती उपकार सांगावे तितके कमी आहेत,पुढे बोलताना म्हणाले पक्षाकडूनही निवडणुकीची जबाबदारीसाठी अनेक बैठका सुरू आहेत परंतु या मातीमुळे व जनतेच्या अशिर्वादामुळे कल्पनेच्या पुढे संधी मिळाली असल्यामुळे या मातीतील जनतेची सेवा करणे ही आपली प्राथमिककता राहणार असल्याचे शेवटी सांगितले 

बाजार समितीत शेतकऱ्याला अत्यल्प शुल्कात जेवण आणि नाष्टा – युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर

कर्मयोगी दादासाहेब यांच्या जयंती निमित्त निलंगा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये  माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना 20 रुपयात जेवण आणि 10 रुपयात नाष्टा देण्याचा निर्धार युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केला व पुढे म्हणाले निलंगा बाजार समिती ही ड वर्ग बाजार समिती आहे भविष्यात  अ वर्ग बाजार समिती  करणार असल्याचा  संकल्प युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केला,  बाजार समिती निवडणुकीत अनेकांनी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केले पण आम्ही बदल घडविण्यासाठी निवडणूक लढविली आम्ही आठ महिन्यात शेतकऱ्याचा विश्वास संपादन केला तोट्यात बाजार समिती फायद्यात आणली    व निलंगा बाजार समिती अ वर्ग करणार असून  येथील बाजार समितीत व्यापारी व शेतकऱ्यांच्या समन्वयाने अर्थिक उलाढाल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक सभापती शिवकुमार चिंचनसुरे यांनी केले तर सुत्रसंचालन सतीश हानेगावे यानी आभार सचिव संतोष पाटील यानी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *