डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त निलंग्यात जनसागर उसळला
निलंगा- राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सिंचनाचे जनक डॉ.शिवाजीराव पाटील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त निलंग्यात जनसागर उसळला. यावेळी निलंगा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

यावेळी अनेक मान्यवरांनी दादासाहेबांच्या कार्यावर व जीवनपटलावर मनोगत व्यक्त केले तसेच दादासाहेबांच्या एकनिष्ठतेचे विचार समाजामध्ये रुजविले व देशात व राज्यात काँग्रेसच्या विचारांची सरकारआल्याशिवाय राहणार नाही. तर महाराष्ट्र शिक्षण समितीच्या प्रांगणामध्ये असलेल्या स्मारकास फुले वाहून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दादाबाग येथे हजारो नागरिकांनी समाधी स्थळाचे दर्शन घेतले.यावेळी दादासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर नागरिकांमध्ये अश्रू अनावर झाले.तसेच सर्वधर्मीय महाविकास आघाडीच्या वतीने व पदाधिकारी कार्यकर्ते विविध फ्रंट सेलचे पदाधिकारी,नागरिक यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी स्वागत केले.यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते पंडितराव भदरगे, मधुकर पाटील,तालुकाअध्यक्ष विजयकुमार पाटील,प्रदेश सचिव अभय साळुंके, शिरूर अनंतपाळ तालुकाअध्यक्ष आबासाहेब पाटील,डॉक्टर सेलचे अरविंद भातंबरे, अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा. दयानंद चोपणे,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सोनाजीराव कदम,निलंगा अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष लाला पटेल,निलंगा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजित नाईकवाडे,माजी नगराध्यक्ष हमीद शेख,माजी सभापती राम गायकवाड,बिबराळचे तानाजी निडवांचे,माजी पंचायत समिती सदस्य रमेश सोनवणे,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष प्रा.रोहित बनसोडे, प्रदेश जिल्हाध्यक्ष मानवाधिकार ऍड तिरुपती शिंदे, भीमशक्तीचे दिगंबर सूर्यवंशी,गणराज्य संघाचे रामलिंग पटसाळगे, लहुजी शक्ती सेनेचे गोविंद सूर्यवंशी,संभाजी ब्रिगेड प्रमोद कदम,माजी सरपंच पंकज शेळके,व्यंकटराव शिंदे,ज्येष्ठ व्यक्ती पुरुषोत्तम कुलकर्णी,कुमारे,सुनील मूळे ,परमेश्वर सुर्यवंशी पुंडलिक बिराजदार,युवक सरचिटणीस भरत शिंदे, सुनील मूळे,नागनाथ घोलप,ग्राहक सेलचे भरत बियाणी,सोशल मीडियाचे आदेश जारीपटके,अरीचे सचिन गायकवाड,औरादचे विलास कांबळे,
तसेच इतर पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिक यांनी स्मारकावर मोठया संख्येने भाऊगर्दी केली होती.