दुष्काळी उपाययोजना लागू करून दोन वर्षाचा पीकविमा व उसाचा प्रश्न धसास लावण्यासाठी किसान सेनेचे पिंपळ फाट्यावर रास्ता रोको आंदोलन, तासभर वाहतूक ठप्प

लातूर – लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर करूनही अद्याप पर्यंत दुष्काळी उपाययोजना लागू केलेल्या नाहीत. त्या लागू कराव्यात. तसेच गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आलेला नाही, तो तात्काळ देण्यात यावा तसेच पनगेश्वर साखर कारखाना बंद पडल्यामुळे सभासद शेतकऱ्यांचा ऊस शेतात वाळून जात आहे. तो ऊस नेण्याची व्यवस्था कारखान्याने करावी अन्यथा सर्व सभासद शेतकऱ्यांचे प्रत्येकी भरलेले 25 हजार रुपयांचे शेअर्स शेतकऱ्यांना परत करावेत.या व इतर मागण्यासाठी रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी किसान सेनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोळनंगे यांच्या नेतृत्वाखाली आज 9 फेब्रुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रेनापूर येथील पिंपळ फाट्यावर सोयाबीन, हरभरा व वाळलेल्या उसाची होळी करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अंबाजोगाई व लातूरकडे जाणारी वाहतूक तासभर ठप्प झाली होती. यावेळी बंदोबस्तसाठी पोलिसांचा मोठा फोज फाटा होता. रेणापूरच्या तहसीलदार लातूरला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठ कीसाठी गेल्याने नायब तहसीलदार उगिले यांनी आंदोलनकर्त्याचे निवेदन स्वीकारून तसेच रेणा साखर कारखाना, पनगेश्वर साखर कारखाना व मळवटी साखर कारखान्याच्या शेतकी अधिकारी यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जाण्याचे आश्वासन तसेच दुष्काळी उपाययोजना राबवण्याचे व पीक विमा देण्याबाबतचे आश्वासन देण्यात आल्यानंतर सदरचा रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. तत्पूर्वी रेणापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार उगिले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान संभाजी सेना व मनसे शेतकरी सेनेचे प्रारदेशाद्यक्ष संतोष नागरगोजे यांनी आंदोलस्थळी भेट देऊन या आंदोलनाला जाहीर आणि सक्रिय पाठिंबा दिला.
या रस्ता रोको आंदोलनात गजानन बोळंगे यांच्यासह
किसान सेनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब भंडारे उपाध्यक्ष सचिन निकम पाटील , सचिव राजाभाऊ नागरगोजे , विठ्ठलराव माने , राजाभाऊ माने , कालिदास मुंडे , प्रमोद चिकटे , धनाजी बरुरे , दिलीप बरुरे , जगदीश भताने , इलाही शेख ‘ संतराम चिकटे , राजेश काळे , अशोक आगरकर , शंकर पवार , अविनाश हाके, अविनाश देशमुख , दयानंद आगरकर , सौदागर गायकवाड , वैजनाथ शिंदे , ज्ञानोबा मेटे यांच्यासह अदि शेतकरी सहभागी झाले होते .