• Thu. Aug 14th, 2025

राष्ट्रीय युवा फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या जेजे रुग्णालय कर्मचारी संघाने मारली बाजी

Byjantaadmin

Feb 8, 2024

गोवा, मडगाव (प्रतिनिधी- महेश्वर तेटांबे)

१६ वा राष्ट्रीय युवा फुटबॉल स्पर्धा

 नुकतीच गोव्यात मडगाव या ठिकाणी संपन्न झाली. यांत महाराष्ट्राच्या जे जे हॉस्पिटल रुग्णालय कर्मचारी संघाने बाजी मारून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चुरशीच्या ठरलेल्या महाराष्ट्र आणि हरयाणा यांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या प्रवीण सोलंकीने पहिल्या हाफमध्ये पहिला गोल केला आणि दुसऱ्या हाफमध्ये कौशिक सोलंकीने गोल करून हरयाणाला पराभूत करून महाराष्ट्राला आघाडी मिळवून दिली. प्रशिक्षक तुषार चौहान आणि छगन चौहान यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय विजेतेपद मिळवून देण्यासाठी विशेष मेहनत घेतली.  महाराष्ट्रातील जे जे हॉस्पिटल रुग्णालय संघाच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे सर्व खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे विशेष कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *