• Mon. May 5th, 2025

ॲड. आढाव पती-पत्नी हत्या तसेच वलांडी लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी : ॲड. जयश्री पाटील

Byjantaadmin

Feb 8, 2024

लातूर :  अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील ॲड . राजाराम जयवंत  आढाव  या पती-पत्नींची निर्घृण  हत्या तसेच लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील  वलांडी येथील सात वर्षीय बालिकेवरील  लैंगिक अत्याचार प्रकरणी  दोषी आरोपींवर  तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र वुमन फेडरेशनच्या अध्यक्षा ॲड.  जयश्री पाटील यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्याकडे केली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील   राहुरी येथील  ॲड.  राजाराम जयवंत आढाव पती व  ॲड.  मनीषा राजाराम आढाव पत्नी  या वकिल दाम्पत्यांची अमानुषपणे हत्या  करण्यात आली. न्याय व हक्क यासाठी काम करणारे वकील त्यांचीच हत्या होणे हे अत्यंत दुर्दैवी  व  क्रूर घटना आहे. या प्रकरणी    गुन्हेगाराला कठोर शासन करावे व  वकिल संरक्षण कायदा पास करावा . त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात वलांडी या गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.  एका नराधमाने सात वर्षीय लहान मुलीवर  लैंगिक अत्याचार केला आहे. ही घटना  अतिशय वाईट आहे. असे कुकृत्य करणाऱ्या  नराधम आरोपीला शासनाने कठोर शासन करावे व अशा घटना पुढे घडणार नाहीत, यासाठी  त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ॲड.  जयश्री पाटील यांनी केली आहे. आपल्या मागणीचे निवेदन  जिल्हाधिकारीवर्षा ठाकूर- घुगे यांना निवेदन देण्यात आले.

                 महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्स ही संस्था ऑल इंडिया फेडरेशनशी जोडलेली आहे.  ही संस्था महिला  वकिलांची संस्था असून महिला वकील मुली व महिलासाठी कायद्याची जनजागृतीचे काम करत असते. यावेळी महाराष्ट्र वुमन फेडरेशनच्या अध्यक्षा ॲड. जयश्री पाटील,  ॲड. किरण चिंते,  ॲड. चारुशीला पाटील,  ॲड. बबीता संकाये, लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन्स लॉयर्स चे महिला वकील सदस्या ॲड.  संगीता ढगे,  ॲड. प्रतिभा कुलकर्णी,  ॲड. अरुणा वाघमारे,  ॲड.  गायत्री नल्ले,  ॲड.  वसुधा नाळापुरे,  ॲड.  रेहाना तांबोळी,  ॲड.  सविता दासे,  ॲड.   दीक्षा गवारे, ॲड. सलोनी डोके, ॲड. सरिता कांबळे, ॲड. मनीषा आनंदगावकर,  ॲड.  रेश्मा सय्यद,   ॲड.  सुप्रिया आटकरे,   ॲड.  रोहिणी वाघोलीकर, ॲड.  शितल सोनकांबळे,  ॲड.  पल्लवी कुलकर्णी,  ॲड. बिना कांबळे आदी  महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *