केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या हुकुमशाही वृत्तीचा राष्ट्रवादी काँग्रेस निलंगा (शरदचंद्र पवार) तर्फे जाहीर निषेध
निलंगा:- येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने
दिनांक ६ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार व पक्षाच्या विरोधात अतिशय पक्षपाती निकाल दिला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार) निलंगा तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार हार घालून, केंद्र सरकारचे बाहुले बनुन निवडणूक आयोगाने पक्षपातीपणे निर्णय घेतल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

२५ वर्षे ज्या पक्षाला उभे केले, ज्या पक्षाचे संगोपन केले त्या पक्षाचे नाव व चिन्ह आदरणीय साहेबांकडून हिसकावून घेण्यात आले. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था राहिली नसून ती सत्ताधाऱ्यांच्या हाताखालचे बाहुले बनुन काम करत आहे. केंद्र सरकार, सरकारी तपास यंत्रणेचा गैरवापर करून लोकशाही पद्धतीने निवडून आलेली सरकारे पाडणे, विरोधी पक्षातील नेत्यांना ईडी, इन्कम टॅक्स, सिबीआय च्या माध्यमातून धाडी टाकून अटक करणे, सत्तेचा, पैशाचा अमीष दाखवून पक्षात फुट पाडणे सत्तेच्या जोरावर संपूर्ण पक्ष व त्यांचे सिम्बॉल निवडणूक आयोगामार्फत हिसकावून घेत लोकशाहीची हत्या केली आहे.
देशात अघोषित आणीबाणी सदृश परीस्थिती निर्माण झाली आहे
या पक्षपाती व हुकुमशाही निकालाच्या निषेधार्थ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या केंद्र सरकारचा व केंद्र सरकारचे बाहुले बनुन लोकशाही ची हत्या करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात निवडणूक आयोग व केंद्र सरकारने लोकशाहीची चाललेली थट्टा यावर विविध घोषणा देण्यात आल्या.
१. अलबत्त्या गलबत्त्या
सरकार करतंय लोकशाहीची हत्या…
२. झुकलंय सरकार, हरलंय सरकार
३. जनतेला नाही आधार
सरकार झालंय लाचार
४. जनता खातेय खस्ता
भाजपला दाखवू घरचा रस्ता
५. सरकार झालंय मूक,
भाजपला फक्त सत्तेची भूक
६. भाजपला जडलाय आजार,
मतदानात करतंय काळाबाजार…
७. जनता उपाशी, सरकार तुपाशी
८. सरकारच्या नुसत्याच अनाभाका,
कधी होणार निवडणुका?
९. भाजप आवळतेय फास,
जनतेच्या तोंडचा पळवतेय घास…
१०. लोकशाहीच्या नुसत्याच गप्पा,
जनतेला मात्र फसव्या धप्पा…
११. लोकतंत्र हम शरमिंदा है,
तुम्हारे कातिल अभी जिंदा है!
१२. निवडणूक आयोग नाही, फसवणूक आयोग!
१३. सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणाऱ्या फसवणूक आयोगाचा निषेध !
१४. निवडणूक आयोग सत्ताधीशांच्या हातातलं बाहुलं !
१५. लोकशाहीचे मारेकरी अजूनही मोकाट !
१६. लोकशाहीसाठी काळा दिवस,
निवडणूक आयोगही विकलं गेलं.