LATUR -1962 साली तयार झालेला लातुर लोकसभा मतदारसंघ हा काही वर्षांचा अपवाद वगळला तर काँग्रेसचा गड राहिला आहे. 2014 च्या मोदी लाटेत देशभरात काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. लातुरात देखील तेच घडले. सुमारे चार दशके केवळ लातुरच नाही तर राज्य व देशाच्या सत्ताकारणात राहिलेल्य काँग्रेस नेत्रत्वाला पराभवाचा सामना करावा लागला. 2004 साली भाजपच्या नवख्या उमेदवार रूपाताई दिलीपराव पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचे बलाढ्य नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचा जवळपास 30 हजार मतांनी पराभव केला होता त्या नंतर म्हणजे 2009 साली मतदारसंघ पुर्नरचनतेत लातुर मतदारसंघ हा राखीव झाला .या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी कोल्हापूर येथील जयवंत गंगाराम आवळे यांनी उमेदवारी दिली व आठ हजार मतांनी भाजपचे डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांचा पराभव झाला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात मोदी लाटेत लातुर पुन्हा भाजप कडे गेला काँग्रेस चे माजी जि. प अध्यक्ष दत्तात्रय गुंडेराव बनसोडे गुरुजी यांचा भाजपचे डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी तब्बल 2 लाख 53 हजारांनी पराभव केला. तर 2019 च्या निवडणुकीत देखील भाजपच्या सुधाकर तुकाराम शंगारे यांनी तब्बल 2 लाख 86 हजार मतांची आघाडी घेत काँग्रेसचे उमेदवार machnidra गुणवंतराव कामत यांना धूळ चारली. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीला गमावलेला हा गड परत मिळवायचा आहे. तर दुसरीकडे भाजप हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे. अनुसुचीत जाती साठी राखीव असलेल्या या मतदारसंघात नेमके काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख ची पकड ही लातुर ग्रामीण व शहरात जरी असली तरी लातुर लोकसभा निवडणूक ही त्यांच्यासाठी देखील इतकी सहज नाहीये. लातुर लोकसभा मतदारसंघ हा ६ विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. यातील निलंगा, लातुर ग्रामीण , लातुर शहर, उदगीर, अहमदपूर, लोहा (नांदेड) या मतदारसंघाचा समावेश आहे त्यात भाजपचे निलंगा येथे आमदार आहेत. तर इकडे अहमदपूर व उदगीर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार आहेत लातुर शहर व ग्रामीण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे आमदार आहेत तर लोहा कंधार हा शेकाप कडे आहे . महायुती व महाविकास आघाडीची ताकद विधानसभेच्या तुलनेत बरोबर ठरत आहे.दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवदीत उभी फूट पडल्याने अनेक नेत्यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे लातुर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची अवस्था ही संघटनात्मकदृष्ट्या केविलवाणी आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्यादृष्टीने माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केलीय. मतदारसंघात काँग्रेसची पुनश्च बांधणी करताना दिसून येत आहेत. गेल्या आठवड्यात लातुरात मराठवाडा स्तर काँग्रेस पक्ष पद्धधिकारी यांचा मेळावा संपन्न झाला यामुळे काँग्रेस नेते ,पद्धधिकारी, कार्यकर्ते यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे .लातुर शहर व ग्रामीण मध्ये माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची पकड असली तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्यांचा थेट संपर्क नाहीये. त्यामुळे ग्रामीण भागात महाविकास आघाडी म्हणून जोरदार प्रयत्न येत्या काळात करावे लागणार आहेत.
सलग दोन वेळेस झालेल्या विजयाने भाजपला मोठे आत्मविश्वास आहे. मात्र मागच्या दोन खासदारांच्या कामगिरीवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले गेल्याने आणखी चांगल्या चेहऱ्याच्या शोधात भाजप असल्याचे बोलले जातेय. उदगीर चे माजी आमदार सुधाकर भालेराव, अनिल गायकवाड यांच्यासह अनेक नावं चर्चेत आहेत. तर काँग्रसकडून माजी सनदी अधिकारी भा. ई. नागराळे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. लातुर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे नेमके काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.सक्षम उमेदवार सक्षम प्रचार यंत्रणा व पक्षातील गटबाजी दूर झाल्यास काँग्रेस महाविकास आघाडीचा उमदेवर लोकसभा निवडणुकीत विजय होईल असे सामान्य काँग्रेस व महाविकास आघाडीतील कार्यकर्ते चा मत आहे.(MOIZ SITARI)