कोकळगाव – सांगवी तेरणा नदीवरील ५ कोटींच्या कोल्हापूरी पुलवजा बंधारा कामाचे आ. अभिमन्यू पवार यांचे भूमिपूजन
निलंगा;-जलसंधारण विभागाकडून मंजूर करून आणलेल्या कोकळगाव – सांगवी तेरणा नदीवरील ५ कोटींच्या कोल्हापूरी पुलवजा बंधारा कामाचे, परिसरातील शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते भूमिपूजन केले. “या पुलवजा बंधार्यामुळे कोकळगाव व सांगवी गावातील शेतकरी बांधवांची ३० वर्षांपासूनची अडचण कायमस्वरूपी दूर होणार असल्याचा आनंद असून औसा मतदारसंघात सीएसआरमधुन जलसंधारणाची शेकडो कामे लवकरच हाती घेतली जाणार आहेत” असे मनोगत आमदार पवार यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी कार्यकारी अभियंता श्री अनिल कांबळे, उपअभियंता श्री प्रमोद काळे, उपअभियंता श्री विवेकानंद मगर, कासार सिरसी मंडळाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर वाकडे, श्री विशाल कराड, श्री स्वप्नील टेंकाळे, श्री सुरेश सगर, माजी सरपंच श्री नागोराव राठोड, श्री संग्राम बिराजदार, श्री सपोनी रियाज शेख, श्री किसान खजुरे, श्री बालाजी निकम, श्री प्रदीप कांबळे, श्री विलास काळे, श्री धनराज सुर्यवंशी, श्री नितीन पाटील, श्रीमती कल्पनाताई ढविले, श्रीमती कविताताई गोरे, श्री परमेश्वर बिराजदार, श्री नानासाहेब धुमाळ, पत्रकार श्री सतिश सरतापे शेतकरी बांधव उपस्थित होते.