निलंगा-निलंगा-नणंद-शिंगनाळ-जेवरी- सांगवी- किल्लारी – आशिव मार्गे जाणाऱ्या राज्य महामार्ग लगतच्या जमिनी,घरे,झाडे राज्य महामार्गात जात आहेत त्याचा मोबदला मिळाल्याशिवाय रस्ता होऊ देणार नाही असे आव्हान युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे केले आहे.

नणंद-शिंगनाळ-जेवरी- सांगवी- किल्लारी – आशिव मार्गे राज्य महामार्ग क्रमांक 238 जात असून शासनाच्या माध्यमातून आजपर्यंत या मार्गावरील एकाही शेतकऱ्यांना प्रत्यक्षात नोटीस देऊन रस्त्यालगतच्या जमिनीचे अधिग्रहण झाले अथवा नाही अशी सूचना देण्यात आली नाही व या मार्गावरील जाणाऱ्या जमिनीचा मावेजा अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही, शेतकऱ्यांच्या 8 अ वर राज्यमार्गाची नोंद किंवा जमिनी कमी झालेल्या नाहीत. या महामार्गावरील नणंद,शिंगनाळ, जेवरी,सांगवी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे, फळझाडे राज्य महामार्गात जात आहेत. तरी उपविभागीय आधिकाऱ्यांनी तात्काळ सर्वे करून कोणत्या शेतकऱ्याच्या किती जमिनी,घरे, फळझाडे जाणार आहेत त्या प्रमाणात शासकीय नियमानुसार घरांचा झाडांचा व जागेचा मावेजा द्यावा अन्यथा शिवसेना व युवासेनेच्या वतीने शेतकऱ्याच्यासोबत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी प्रशासनास दिला आहे. निवेदन देताना युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे, लादे विजयकुमार, उपसरपंच दिगंबर सूर्यवंशी, माजी उपसरपंच बळीराम टोपन्ना, राजकुमार कांबळे, राजकुमार देवसाळे,महिला शिवसेना शहरप्रमुख दैवताताई सगर, सतीश देवसाळे, मधुर बिराजदार, राम मिरगाळे, विष्णू मोरे, धनराज नागरे, गुरुलिंग स्वामी, नरसिंग शिंदे, धर्मांना बिराजदार, बालाजी मिरगाळे, राजकुमार तांबाळे, माधव नागरे, आयुब पटेल शिंगणाळच्या सरपंच सुवर्णा सतीश मोहिते, दिनकर पाटील, दत्ता मोहिते,विजयकुमार मोहिते, शेषाबाई आगलावे इत्यादी शेतकरी उपस्थित होते. निवेदन देताना सोबत ननंद, सिंगनाळ, जेवरी व सागवी गावचे अनेक शेतकरी उपस्थित होते.