• Tue. Apr 29th, 2025

गाव चलो अभियानाच्या माध्यमातून भाजपा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार -माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती

Byjantaadmin

Feb 5, 2024

लातूर (प्रतिनिधी):-भारतीय जनता पार्टीतर्फे 4 ते 11 फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे.  या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, अशी माहिती माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर. यांनी दिली.या अभियानाच्‍या माध्‍यमातून लातूर लोकसभा मतदारसंघातील साडे तीन लाख घरांना भेटी देण्‍यात येणार असुन याकरीता पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी व सुपर वॉरियर्स या अभियानात सहभागी होणार आहेत. या अभियानासाठी आवश्‍यक असणारी सर्व तयारी झालेली असुन या अभियानाद्वारे आगामी लोकसभा निवडणुक विक्रमी मताधिक्‍याने जिंकण्‍याचा संकल्‍प केला असल्‍याचे माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

          लातूर येथील शासकीय विश्रामगृह गाव चलो अभियानाची माहिती देण्‍यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर  बोलत होते. यावेळी जिल्‍हाध्‍यक्ष दिलीपराव देशमुख, जिल्‍हा सचिव, अॅड.भारत चामे, शहर सरचिटणीस शिरीष कुलकर्णी, तुकाराम गोरे,बब्रुवान खंदाडे आदीची उपस्थिती होती.

          आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपा कार्य करत आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या 10 वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने ‘गाव चलो अभियान’ हाती घेण्यात आले आहे. मोदीजींची गॅरंटी काय आहे हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात य़ेणार आहेत.

          शहरी भागात वॉर्ड निहाय हे अभियान राबविले जाईल. या अंतर्गत राज्यात 50 हजार युनिट्समध्ये भाजपाचे 50 हजार प्रवासी नेते, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहेत. पक्षाचे आजी व माजी खासदार, आमदार, जि.प सदस्य यांच्यासोबतच सर्व नेतेमंडळी जिल्ह्यातील प्रत्येक युनिटमध्ये प्रवास करतील व त्यांना सुपर वॉरियर्सचे देखील सहकार्य मिळेल, अशी माहिती आ.निलंगेकर यांनी दिली.    

          प्रत्येक युनिटमध्ये भाजपाचा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून, बुथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली 18 संघटनात्मक कामे करेल, असेही माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले .या अभियानात नव मतदारासह युवकांसाठी आयोजित नमो चषक क्रीडा स्‍पर्धेचे आयोजन होत असुन याद्वारे त्‍यांच्‍याशी संपर्क साधण्‍यात येणार आहे. तसेच महिलांसाठी शक्‍तीवंदन हा कार्यक्रम होणार असुन या कार्यक्रमात महिला बचत गटांच्‍या प्रतिनिधीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. नुकताच अंतिरम अर्थसंकल्‍प मांडण्‍यात आलेला असुन या संकल्‍पातील ठळक तरतुदीच्‍या माध्‍यमातून आगामी विकसित भारतचा अजेंडा जनतेसमोर ठेवत मोदीची गॅरंटी काय आहे आणि त्‍या गॅरंटीच्‍या माध्‍यमातून देशात जो बददल घडत आहे याबाबत सांगण्‍यात येणार असल्‍याचे माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्‍पष्‍ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed