लातूर/प्रतिनिधी: रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या रोटरी की पाठशाला उपक्रमांतर्गत ७०० शाळांना ग्रंथालयांचे वाटप करण्यात आले.जालना येथील कालिका स्टीलच्या सीएसआर फंडातून रोटरी क्लब ऑफ जालना च्या माध्यमातुन हा उपक्रम राबविण्यात आला.याच कार्यक्रमात रोटरी उत्कृष्ट सेवा व्यवसाय पुरस्कारांचे वितरणही संपन्न झाले.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमा अंतर्गत ग्रंथालय वितरण कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या पुढाकारातून करण्यात आले.मिडटाऊनच्य कार्यक्षेत्रातील ४० शाळांनाही ग्रंथालयांचे वितरण करण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक्ट अंतर्गत मराठवाड्यातील आठ जिल्हे तसेच सोलापूर, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील ७०० जिल्हा परिषद शाळांना या ग्रंथालयांचे वितरण करण्यात आले.यासाठी कालिका स्टीलने अर्थसहाय्य सीएसआर फंडातून केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रांतपाल स्वाती हेरकळ यांच्यासह सहाय्यक प्रांतपाल विशाल जैन,रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे चेअरमन रविंद्र बनकर,सचिव डॉ.अविनाश भोसले व किशोर दाताळ, विजयकुमार बिराजदार, श्रीनिवास भंडे, ओमप्रकाश झुरुळे,पवन मालपाणी,अमोल दाडगे यांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रांतपाल स्वाती हेरकळ यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवल्याबद्दल रोटरी परिवारातील सदस्यांचे अभिनंदन केले.याच कार्यक्रमात मूल्याधारित व्यवसाय करून समाजासमोर नव्या संकल्पना मांडत आदर्श निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांचा रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने गौरव करण्यात आला. अभियंता शांतेश्वर बरबडे, हॉटेल व्यवसायिक प्रविण कस्तुरे,विवेकानंद रुग्णालयातील डायलिसिस तंत्रज्ञ बिरू हजारे,उद्योजक डॉ.विजय जाधव,स्कुलबस चालक सौ.जयश्री करवंजीकर यांना त्यांच्या सामाजिक योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. प्रारंभी रवींद्र बनकर, ओमप्रकाश झुरुळे,पवन मालपाणी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रकल्प चेअरमन श्रीनिवास भंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर विशाल अयाचित यांनी सूत्रसंचलन केले.या कार्यक्रमास विविध शाळांचे मुख्याध्यापक, नागरिक आणि रोटरी परिवारातील सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.