आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कडून अनसरवाडा येथील धनगर समाजाच्या सभागृहासाठी 10 लक्ष निधी
निलंगा प्रतिनिधी
तालुक्यातील अनसरवाडा गावातील सकल धनगर समाजाच्या वतीने मा.आमदार संभाजी पाटिल निलंगेकर यांची भेट घेऊन धनगर समाजा साठी अनसरवाडा येथे सभागृहाची मागणी केली यावेळी निलंगेकर यांनी ही मागणी लगेच मान्य केले व 10 लक्ष रुपये चा निधी सभागृहासाठी देण्याचे जाहीर केले. तसेच अनसरवाडा गावातील धनगर समाजाची समिती गठन करून त्यात अध्यक्षपदी सुनील वरवटे, उपाध्यक्षपदी विजयकुमार गोबाडे गुरुजी, सचिवपदी विनायक सूर्यवंशी, सल्लागार म्हणून मनोज बडगिरे यांची निवड करण्यात आली, यावेळी आमदार संभाजी पाटील यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला येणाऱ्या काळात विकास कामासाठी निधी ची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन दिले, यावेळी औराद बाजारसमिती चे संचालक धनराज माने, माजी सरपंच सुनील वरवटे, ग्रामपंचायत सदस्य नयन धनराज माने, विनायक सूर्यवंशी,सोसायटीचे संचालक मारुती बडगिरे,विजय कुमार गोबाडे गुरुजी,श्रीपती वरवटे,गोविंद बडगिरे, वामन वरवटे, खंडू वरवटे, राजू गोबाडे, श्रीमंत सूर्यवंशी, हनुमंत सूर्यवंशी,व्यंकट सूर्यवंशी,सचिन गोबाडे,अजित बडगिरे,अशोक वरवटे, धोंडीराम वरवटे, नारायण वरवटे, रंगा वरवटे, मल्लिनाथ वरवटे, म्हाळाप्पा वरवाटे, आदी सह अनसरवाडा येथिल शंभर ते सव्वाशे धनगर समाज बांधव उपस्थित होते..
