• Tue. Apr 29th, 2025

३१ मार्च पुर्वी सर्व ऊसाचे गाळप करण्याच्या माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या सुचनाजागृती शुगरचे ८८ दिवसात ४ लाख ९ हजार मे. टनाचे गाळप

Byjantaadmin

Feb 2, 2024



जागृतीने सक्षम नियोजनातून घालून दिला आदर्श

लातूर -शेतकरी सभासदांच्या जिवनात आपल्या कार्यातून अमुलाग्र आर्थ‍िक बदल घडवून आणत असलेल्या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अलाईड इंडस्ट्रीजने  २०२३-२०२४ मध्ये चालु गळीत हंगामात केवळ ८८ दिवसात ४ लाख ९ हजार मे.टनाचे ऊसाचे गाळप करुन सक्षम नियोजनाचा एक आदर्श घालून दिला असून चालु गळीत हंगाम मार्च ३१ पूर्वी ऊसाचे गाळप व्हावे अशा सूचना जागृती शुगर चे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी कारखाना प्रशासनास दिल्या आहेत



जागृती शुगर कडून २० जानेवारी पर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे पेमेंट अदा

जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली  नियोजनानुसार २० जानेवारी २०२३ अखेर कारखान्याकडे गाळपास आलेल्या ऊसाला ऊसबिला पोटी प्र.मे.टन २५०० रु. याप्रमाणे पहिला हप्ता दिला असुन  यासोबत ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांचे पेमेंट ठरलेल्या कालावधीत नियमीतपणे अदा केले जात आहेत.
जागृती साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात ८लाख ३६ हजार १०० (५० कि.) इतके पोते साखर उत्पादन केले आहे. ३५ लाख ३३ हजार ४५३ लिटर इतके  इथेनॉल निर्मिती केली आहे. तसेच १ कोटी ३८ लाख ३७ हजार युनिट इतकी वीज वितरीत केली आहे.


दि. ३१ जानेवारी २०२४ अखेर सरासरी ११.०१ एवढा साखर उतारा जागृती कारखान्यास प्राप्त झाला आहे.
क्षमतेपेक्षा जास्तीने गाळप सुरू

चालू गळीत हंगामात शेतकरी सभासदांचे ऊसाचे गाळप तत्परतेने व्हावे या हेतूने प्रति दिन २५०० एवढी गाळप क्षमतेवरुन ५००० मे.टन दैनंदिन गाळप क्षमता साखर कारखान्याने केली आहे. त्यामुळे या भागातील अतिरीक्त ऊस जागृती साखर कारखाना मार्च पर्यंत सुरु ठेवणार असून गाळपाचे नियोजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  केले आहे असून
जागृती शुगरने नेहमीच बदलत्या आधुनिक परिस्थ‍ितीत काळाची गरज ओळखुन पावले उचलली आहेत. उपपदार्थ निर्मितीतून अधिकचा ऊसदर शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.


उसाचे गाळप ३१ मार्च पूर्वी करावे  कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या सूचना


कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी कारखान्याच्या चालु गाळप कामाचा अधिकारी यांच्यासोबत  आढावा घेतला असून कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा शिल्लक राहिलेला सर्व ऊस गाळप होण्याच्या दृष्टीने कारखाना व्यवस्थापनास सुचना केल्या आहेत. त्यादृष्टीने कारखाना व्यवस्थापन नियोजन करत असून दि. ३१ मार्च २०२४ पुर्वी सर्व ऊसाचे गाळप जागृती कारखाना करणार असून  त्यामुळे कोणत्याही परिस्थ‍ितीत शेतकऱ्यांनी चिंता करु नये असे आवाहन जागृती कारखान्याच्या चेअरमन तथा कार्यकारी संचालिका सौ. गौरवीताई अतुलजी भोसले, उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, जनरल मॅनेजर गणेश येवले यांनी केले आहे.

DCIM\100MEDIA\DJI_0073.JPG

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed