ईडी,सीबीआय,इन्कम टॅक्स या केंद्रीय संस्थेच्या गैरवापराबाबत निलंगा येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे घंटानाद आंदोलन
निलंगा:-केंद्र सरकार च्या स्वायत्त संस्था ईडी,सीबीआई,इन्कम टॅक्स या केंद्र सरकार च्या संस्थामार्फत विरोधी पक्षातील नेत्यांना विशिष्ठ लक्ष करुन सुडाचे राजकारण करण्यात हे सरकार व्यस्त आहे.
देशातील महागाई,बेरोजगारी कमी करण्यासाठी व नविन नौकरी उपलब्ध करण्यात केंद्र व राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.महागाई, बेरोजगारी या मुद्याला बगल देऊन केंद्र सरकार च्या मदतीने सविस्तर जाणीवपुर्वक पक्ष फोडण्यात व नेत्यांना टार्गेटेड राजकारण करण्यात सध्याचे केंद्र व राज्य सरकार व्यस्त आहे.
या घंटानाद आंदोलन निम्मिताने सरकार कडे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी निलंगा यांच्या वतीने अन्य काही मागण्या करण्यात आल्या आहेत.
* सुडबुध्दीने होणारे कारवाई त्वरित थांबवाव्या.
* महिला सक्षमीकरणासाठी शक्ती कायद्याची त्वरीत अंबलबजावणी करावी.
* पेपर फुटी वर मजबुत कायदा करावा.
* कंत्राटी भरती त्वरीत रद्द करावी.
* विद्यार्थीचे शैक्षणिक कर्जावरील व्याज तात्काळ माफ कराव्यात.
* सर्व परिक्षा करिता एमपीएसी मार्फत घेण्यात यावा.
* शेतकरी वर्गाना अवकाळी व दुष्काळी अनुदान वेळेत पंचनामे करुन तात्काळ वितरीत कराव्यात
* मराठा, धनगर आरक्षणावरील सर्व त्रुटी दुर करुन लवकर आरक्षण लागु करावे यासह अनेक मागण्याचे पत्र यावेळी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना देण्यात आले.
यावेळी सुधीर मसलगे , लक्ष्मण कांबळे , इस्माईल लदाफ , महेश चव्हाण, इंजि. विनायक बगदुरे, विलास माने , अंगद जाधव , सुग्रीव सूर्यवंशी , लक्ष्मण क्षीरसागर, धोंडीराम वाघमारे , मोहन माने , इफरोज शैख , लिंबराज बिराजदार, समीउलला कादरी , मुसा पठाण , राजेश माने , निजाम शैख , अलीम फारुकी , मारुतीराव गायकवाड , नाजिर शैख , प्रविण कवटकर , जहांगीर फकीर, शंकर बनसोडे , बालाजी शिंदे , नसीम तांबोळी , विकास ढेरे, विकास शिंदे यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
