आ.धिरज देशमुख व सौ.दीपशिखाताई देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडलचे वितरण
लातूर :– रेणापूर,लातूर व औसा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी “रीड लातूर” उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, मेडल व रायटिंग बुक चे वाटप रीड लातूर उपक्रमाचे संस्थापक आ.धिरज विलासराव देशमुख व सौ.दीपशिखाताई धिरज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले

“रीड लातूर”कडून सौ. दीपशिखाताई धिरज देशमुख व आ.धिरज विलासराव देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतून नुकतेच निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी, * मला आवडलेले पुस्तक, वाचनाचे महत्त्व, वाचाल तर वाचाल, पुस्तक माझा मित्र, वाचन संस्कृतीचे महत्त्व असे विषय ठेवण्यात आले होते.ही स्पर्धा इयत्ता १ ते ४,५ ते ८ व ९ ते १० अशा गटासाठी आयोजित केली होती. इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत हे निबंध लिहिण्याची सहमती विद्यार्थ्यांना दिली होती.
यामध्ये लातूर, रेणापूर व औसा तालुक्यातील मळवटी, जवळगा, आनंद नगर, काळमाथा,चिखुर्डा,आंदोरा, कोळपा,वांजरखेडा, भादा, कासारखेडा, ढाकणी, आश्रम शाळा रेणापुर, टाकळी(शी), बोरी, मांजरी, घनसरगाव, सारोळा, दयानंद विद्यालय बाभळगाव, गौरीशंकर विद्यालय धनेगाव, श्रीराम विद्यालय ममदापूर, रविशंकर विद्यालय लातूर, मोहम्मद इकबाल गर्ल्स हायस्कूल लातूर, नांदगाव, बोरी अशा २५ शाळांमधील एकूण 180 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वैशिष्ट्य म्हणजे 150 पैकी 106 मुलींनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
यावेळी बोलताना “रीड लातूर”चे संस्थापक आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, विविध प्रकारचे साहीत्य लेखन वाचनामुळे व्यक्तीमत्वाचा विकास होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासा सोबत प्रेरणादायी गोष्टी, आत्मकथा, कविता असे प्रकारची पुस्तकांचे वाचन नियमितपणे करावे.मराठी सोबतच हिंदी व इंग्रजी भाषा अवगत करणे गरजेचे आहे. रीड लातूर उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा ठरत आहे.विद्यार्थ्यांच्या हातात देशाचे भविष्य असून आजचा विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न असावा यादृष्टीने आपली वाटचाल असावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रसंगी “रीड लातूर” च्या संस्थापक सौ.दीपशिखाताई धिरज देशमुख यांनी विद्यार्थ्यांना डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची प्रोत्साहन पर कविता म्हणून दाखवली व विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.आपल्या प्रास्ताविकात रीड लातूर चे समन्वयक राजू सी पाटील यांनी निबंध स्पर्धेमागची भुमीका व्यक्त करून रीड लातूर उपक्रमाच्या कार्याचा आढावा सादर केला. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी देखील आपले मनोगत केले. कार्यक्रमास प्रवीण पाटील, आर डी गायकवाड, राजू नागरगोजे, सुरेश सुडे,एस.यू.नागापुरे,सविता धर्माधिकारी,सौ.मंदाकिनी भालके, विलास पुरी,यांच्यासह विद्यार्थी पालक व शिक्षक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार श्री प्रविण पाटील यांनी व्यक्त केले.
—