द वर्ल्ड स्कूल इंडिया,निलंगा या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
निलंगा – द वर्ल्ड इंग्लिश स्कूल निलंगाच्या माध्यमातून दि.31/01/2024 रोजी निलंगा डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृह न.प. निलंगा सभागृहरात येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. अत्यंत उत्कृष्टरित्या लहान बालकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.कमी कालावधीतच सदरील शाळा निलंगा शहरात नावारूपाला आली आहे .

संचालक प्राचार्य सुशिल जाधव,उपप्राचार्य सौ.करूणा जाधव व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवर्ग शाळेला प्रगतीपथावर नेण्याचा काम करीत आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.राजकुमार जाधव ,श्री कोचिंग क्लासेसचे प्रा. डॉ. गजेंद्र तरंगे सर ,डाॅ.विक्रांत कुंडूबंले ,अनंतराव गायकवाड,राजकुमार कत्तेसाहेब,ॲड. ज्ञानेश्वर भालके,विजयकुमार उर्फ बप्पा कावळे प्रा.दत्ता माने, मोईज सितारी, प्रा. हरिश्चंद्र शेळके वैशाली दुधने, संतोष पाटील, दत्तात्रेय पाटील,अजित जाधव,सदाशिव जाधव पालक,विद्यार्थी इ.उपस्थित होते.
