• Tue. Apr 29th, 2025

…तर संभाजीराजेंना कोल्हापूरची उमेदवारी देणार! महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये झालं एकमत

Byjantaadmin

Feb 1, 2024

सध्या देशात आगामी लोकसभा निवडणूकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यादरम्यान महाविकास आघाडीत आल्यास लोकसभेसाठी संभाजीराजेंना कोल्हापूरची उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडीतील तीन पैकी एका पक्षात प्रवेश केल्यास संभाजीराजे छत्रपती यांची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले जाते आहे. संभाजीराजे छत्रपती राज्यसभेचे माजी खासदार आहेत.दरम्यान शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यापैकी एखाद्या पक्षात संभाजीराजेंनी प्रवेश केल्यास लोकसभेला उमेदवारी निश्चित अससल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये याबाबत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे आता संभाजीराजे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed