• Mon. Apr 28th, 2025

मोटारसायकल व मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक

Byjantaadmin

Feb 1, 2024

मोटारसायकल व मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक. चोरीचे 21 मोबाईल, 11 मोटर सायकली,1 लॅपटॉप असा एकूण 08 लाख 32 हजार रुपयाच्या मुद्देमालासह 6 आरोपींना अटक. वरिष्ठाचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. चोरीचे 8 गुन्हे उघड.

LATUR -पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीमधून मोटार सायकल चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हे दाखल झाला होता. तसेच इतर पोलीस स्टेशनला देखील मोटर सायकल, मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल होतेपोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या. सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्यात येत होते.

वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून मोटार सायकल व मोबाईल चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली.माहितीची बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून मोटर सायकल व मोबाईल चोरी करून ते मोबाईल कमी किमतीत लोकांना विकणाऱ्या आरोपींची टोळी निष्पन्न करून, टोळीतील सदस्यांना त्यांच्या राहते ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे.पथकांनी अतिशय कुशलतेने व उत्कृष्टपणे नमूद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन खालील आरोपींना चोरी केलेला 1 लॅपटॉप, 11 मोटरसायकली व 21 मोबाईलसह ताब्यात घेण्यात आले.

1)अक्षय प्रभाकर कणसे,वय 28 वर्ष, राहणार वाल्मिकी नगर,गल्ली नंबर 3, लातूर.

2) समाधान बाळासाहेब जाधव, वय 20 वर्ष, राहणार काडगाव ,तालुका जिल्हा लातूर. सध्या राहणार एस एस लॉजच्या बाजूस, एक नंबर चौक, लातूर.

3) सद्दाम हुसेन शेख,वय 24 वर्ष, राहणार पळसप, तालुका जिल्हा धाराशिव. सध्या राहणार माऊली नगर पाखरसांगवी, लातूर.

4) राम उर्फ लखन सुधाकर संदीले, वय 24 वर्ष राहणार, सरस्वती शाळेच्या पाठीमागे, प्रकाश नगर, लातूर.

5)महेश नामदेव नरहरे, वय 21 वर्ष, राहणार महाळग्रा तालुका चाकूर, जिल्हा लातूर. सध्या राहणार सोना नगर, लातूर.

6) आशिष गोविंद पवार, वय 24 वर्ष, राहणार माळुंब्रा, तालुका औसा जिल्हा लातूर सध्या राहणार सोना नगर, लातूर.

 यांना दिनांक 30/01/2024 रोजी त्यांचे राहते ठिकाणाहून ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या आणखीन तीन साथीदारासह लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल व मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले. नमूद आरोपीनी विविध गुन्ह्यात  चोरलेला मुद्देमाल 1 लॅपटॉप, 21 मोबाईल व 11 मोटारसायकली असा एकूण 8 लाख 32 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल हजर केल्याने वरील आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. तसेच फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलीस ठाणे एमआयडीसी, पोलीस ठाणे शिवाजीनगर, पोलीस ठाणे गांधी चौक,पोलीस ठाणे विवेकानंद, पोलीस ठाणे भादा,तसेच पोलीस ठाणे कळंब जिल्हा धाराशिव येथील 1 गुन्हा असे एकूण 8 मोटरसायकल व मोबाईल चोरीचे गुन्हे उघड झाले असून चोरीचे आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहेगुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसी करीत आहेत.पोलीस पथकांनी अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून मोटार सायकल व मोबाईल चोरणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे ,रियाज सौदागर, मोहन सुरवसे, राजा मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, राहुल सोनकांबळे, मनोज खोसे, राहुल कांबळे, नितीन कठारे, संतोष खांडेकर,नकुल पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed