निलंगा:-मराठवाडा मॅथेमॅटिकल सोसायटी (एम एम एस) आणि महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 20th सेमिनार कॉम्पिटिशन मध्ये महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील बीएससी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी सोनकांबळे रत्नशिल यांने ॲप्लिकेशन्स ऑफ मॅथेमॅटिक्स इन क्रिप्टोग्राफी या विषयावर सेमिनार देऊन द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांमधील एकूण 28 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. महाविद्यालामधून प्रियंका रेवते, निकीता गुमटे, स्नेहा पांचाळ आणि
रत्नशील सोनकांबळे या चार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
मराठवाड्यातील एकूण आठ जिल्ह्यांमधून 16 स्पर्धकांमध्ये अंतिम स्पर्धा दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर येथे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, सचिव बब्रूवान सरतापे, प्राचार्य डॉ. एम. एन. कोळपुळे, गणित विभाग प्रमुख डॉ. एस. पी. बसुदे, डॉ. डी . एम. सुरवसे, प्रा. जगदीश जाधव, प्रा. सुजाता लाळे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी रत्नशिलचे हार्दिक अभिनंदन केले व अंतिम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
