• Mon. Apr 28th, 2025

निलंगा तालुक्यातील अपघातात तीन जण जागीच ठार

Byjantaadmin

Feb 1, 2024

निलंगा तालुक्यातील अपघातात तीन जण जागीच ठार  

निलंगा(प्रतिनिधी):- तालुक्यातील झरी येथे झालेल्या कंटेनर मोटरसायकलच्या विचित्र अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे या विचित्र अपघातामुळे गावात शोककळा पसरली आहे याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक 1 फेब्रुवारी सकाळी सहा वाजता कृष्णा अर्जुन जाधव वय वर्ष 22 व चुलती कस्तुराबाई परमानंद जाधव वय वर्ष 38 रा झरी हे दोघेजण आठ दिवसापूर्वीच खरेदी केलेल्या मोटरसायकल वरून शेताकडे दूध काढण्यासाठी जात होते समोरून येणाऱ्या कंटेनर ने डीडीओ वन आर नाईन झिरो सेवन वन मोटरसायकलला जोराची धडक मारल्याने पुतण्या चुलती पुतण्यासह जागेचा ठार झाले .तर या गावचे माहेरवाशी असलेली अक्षरा किशन सूर्यवंशी वय वर्ष 65 ही महिला पहाटे प्रात विधीसाठी जात होती. मोटर सायकल सह या महिलेलाही जोराची धडक लागल्याने तिघांचाही जागेचा मृत्यू झाला. या विचित्र अपघाताने रस्त्यावर रक्ताचा सडा व मासाचे तुकडे पडले होते .तब्बल तीन तास उदगीर निलंगा या मार्गावरची वाहतूक बंद होती. पोलिसांनी दोन क्रेन व एक जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर आडवे पडलेल्या कंटेनरला बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली कंटेनर व चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed