काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी वड्रा राज्यसभेवर जाणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. या दोन्ही नेत्या राज्यसभा नव्हे, तर लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेसचे नेते, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी ही माहिती दिली.

सोनिया गांधी या सध्या रायबरेलीच्या विद्यमान खासदार आहेत. त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्या आता लोकसभा लढविणार नाही, अशी चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमाणे त्या राज्यसभेवर जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
देशात राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक होत आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपत आहे. सध्या ते हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार आहेत, पण यावेळी येथे काँग्रेसच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथून काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी किंवा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी येथून राज्यसभेवर जाऊ शकतात, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यास प्रियांका गांधी रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात हे जवळपास निश्चित होणार आहे. तसे झाल्यास प्रियांका यांचे निवडणुकीच्या राजकारणातील हे पहिले पाऊल ठरेल. पण सोनिया या लोकसभा लढणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.देशात राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपत आहे. सध्या ते हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार आहेत, पण यावेळी येथे काँग्रेसच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथून काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी किंवा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी येथून राज्यसभेवर जाऊ शकतात, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यास प्रियांका गांधी रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात हे जवळपास निश्चित होणार आहे. तसे झाल्यास प्रियांका यांचे निवडणुकीच्या राजकारणातील हे पहिले पाऊल ठरेल. पण सोनिया या लोकसभा लढणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.