Nilanga -मौखिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दलची जागरूकता निर्माण करण्याची आज गरज आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाकडे वेळ नाही.अशा परिस्थिती आपण स्वतः च्या आरोग्याकडे पण दूर्लक्ष करीत आहोत.दात हे मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे . ज्याद्वारे अन्न पाचना योग्य तयार होत . परंतु दातांची निट शी काळजी आपण घेत नाही हेच दुर्दैव आहे.दांताची योग्य निगा राखण्यासाठी दोन वेळा ब्रश हळुवारपणे करने, हिरड्यांची व्यवस्थित मसाज,मैदायुक्त पदार्थ खाने टाळावे व डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.असे विचार महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथे आयोजित दंत तपासणी शिबीर व मौखिक आरोग्याची जागरूकता या कार्यक्रमात प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ सचिन बसुदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

या शिबीराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ सचिन बसुदे, डॉ भीम खलंग्रे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव कोलपुके यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरात एकुण 50 विद्यार्थी व विद्यार्थिनी ची दंत तपासणी करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव कोलपुके व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक मंचावर डॉ ज्ञानेश्वर चौधरी , डॉ धनंजय जाधव , डॉ भगवान वाघमारे,डॉ गोविंद शिवशेट्टे ,श्री बासु सर,श्री इब्राहिम शेख , उपस्थित होते.शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्रा.बदनाळे एस एस ,प्रा.किवडे धनराज,प्रा.अभिमन्यु गंगाजी,प्रा अत्राम व श्री राजु एखंडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ गोविंद शिवशेट्टे यांनी केले अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ माधव कोलपुके यांनी केले.तर सुत्रसंचलन कु.सरस्वती लंगोटे व आभार कु.कोमल गोमसाळे यांनी मानले.