निलंगा:-मौजे. वलांडी ता. देवणी येथे 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी करीता दि.31/01/2024 रोजी संपूर्ण निलंगा शहर बदं करुन कॅन्डल मोर्चचे नियोजन करणे बाबतचे निवेदन निलंगा पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे

या निवेदन सादर करण्यात येते की, मौजे. वलांडी ता. देवणी जि. लातूर, येथील 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सतत 5 दिवस लैंगिक अत्याचार करुन मानव जातीला काळ फासण्याचे काम केलेले आहे. अशा नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा झालीच पाहिजे,सदरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधम याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देवून पिडीत कुटूंबाला न्याय मिळवून दयावा. याबाबत संपूर्ण सकल हिन्दु समाजातर्फे दिनांक31/01/2024 बार बुधवार रोजी संपूर्ण निलंगा शहर बंदची हाक देत आहोत व श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा स्मारका पर्यत सांयकाळी 5.00 वाजता कॅन्डल मार्चचे आयोजन केले आहे.असे निवेदनात नमूद केले आहे.