माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची काँग्रेस पक्षाच्या निलंगा पदाधिकाऱ्यांनी बाभळगाव निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट
लातूर -राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातुरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची निलंगा शहर व तालुका तसेच इतर ठिकाहून आलेल्या काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, बाभळगाव निवासस्थानी भेट घेतली, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भाने चर्चा झाली. बूथ पातळीवर पक्ष बांधणी करण्याच्या सूचना त्यांना यावेळी दिल्या.
यावेळी लातुर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल उटगे, अभय साळुंके, निलंगा शहर काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष- अजित नाईकवाडे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष- लाला पटेल, दापका ग्रामपंचायत सदस्य- बबलू जाधव, निलंगा शहर युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष- सुहास देशमुख उपस्थित होते.
