• Tue. Apr 29th, 2025

सर्वेक्षणाबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

Byjantaadmin

Jan 29, 2024

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक

लातूर, (जिमाका): महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण जिल्ह्यात सुरु असून त्यात येणाऱ्या अडचणी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडून दूरदृश्य माध्यमातून शुक्रवारी जाणून घेतल्या. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे यांनी या सर्व तांत्रिक अडचणीची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांच्या यंत्रणेला दिल्या.

 यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, लातूर महानगर पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. डॉ. गोविंद काळे यांनी यावेळी लातूर जिल्ह्यातील विविध प्रकल्पासाठी झालेल्या जमीन अधिग्रहणाविषयीची माहिती जाणून घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed