निलंगा- निलंगा तालुका काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निलंगा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजित नाईकवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थितामध्ये निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील,प्रदेश सचिव अभय साळुंखे,माजी नगराध्यक्ष सौ.सुनीताताई चोपणे,माजी नगराध्यक्ष हमीद शेख,अजित माने,अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे, निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,उपाध्यक्ष सोनाजी कदम,माजी शहराध्यक्ष मोहम्मद खान पठाण,माजी नगरसेवक सिराज देशमुख,अशोक शेटकर गोविंद पेटकर,ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.जी.बी.सूर्यवंशी,ऍड.तिरुपती शिंदे,राघवेंद्र कुलकर्णी, सतीश सबनीस,लक्ष्मीकांत सोमाणी,अंबादास देशपांडे, एड.विक्रांत सूर्यवंशी,यासिन मणियार,शेषराव कांबळे,बीएम पाखर सांगवे व शहरातील सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते, व्यापारी,डॉक्टर,वकील व प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर बोलताना म्हणाले की, सध्या देशामध्ये संविधान संपण्याचा घाट काही जातीवादी लोकांकडून होत असून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान टिकवण्यासाठी व धर्मनिरपेक्ष विचाराचे सरकार आणण्यासाठी प्रत्येकांनी वज्रमुठ तयार करणे गरजेचे आहे.काँग्रेसच्या काळात दूरदर्शन चॅनेलवर रामायण महाभारत सारखे मालिका सुरू झाल्या.त्याचबरोबर राजीव गांधी यांनी 18 वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार दिला.तसेच श्रीरामाबद्दल येथील प्रत्येक जनतेच्या मनात आदर असून या सर्व बाबींचा गैरवापर करून आताचे भाजप सरकार जनतेमध्ये विरोधाभास निर्माण करत आहे आता सर्वांनीच वेळी सावध होऊन संविधान वाचविणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
