• Wed. Apr 30th, 2025

निलंगा शहर काँग्रेस कमिटीची नूतन कार्यकारणी जाहीर

Byjantaadmin

Jan 26, 2024

निलंगा-निलंगा शहर काँग्रेस कमिटीची नवीन कार्यकारणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देऊन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख उपस्थिती प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंखे,मा.नगराध्यक्ष सौ.सुनीताताई चोपणे,डॉक्टर सेलचे अरविंद भातम्बरे,शहराध्यक्ष अजित नाईकवाडे,कार्याध्यक्ष ऍड.नारायण सोमवंशी,जिल्हाउपध्यक्ष सुधाकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी उपस्थितामध्ये निलंगा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सोनाजी कदम,विधी मानव सेलचे जिल्हाध्यक्ष तिरुपती शिंदे, निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,औराद शहराध्यक्ष हाजी सराफ,व्यंकटराव शिंदे,ग्राहक सेलचे भरत बियाणी,अल्पसंख्याक सेलचे लाला पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी निवडीच्या संदर्भात अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की,स्व. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा हे छोटे गाव असताना शहराचे स्वरूप आणून जिल्हास्तरावरील व विभागीय पातळीवरील शासकीय कार्यालये निलंग्याला आणून शहराला जिल्ह्याचे वैभव प्राप्त करून दिले.परंतु सध्याचे लोकप्रतिनिधी यांना हे सर्व आणलेले शासकीय कार्यालये टिकवता येत नाहीत. ही फार मोठी शोकांतिका आहे. आज जिल्ह्यात कुठेच नाही अशी मुबलक पिण्याचे पाणी लोअर तेरणा धरणातून आणून निलंगा शहर हे पाणीदार केले.ज्या ज्या वेळी काँग्रेसची सत्ता नगर परिषदवर अली त्या त्या वेळी नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊन मोठया प्रमाणात विकास केला.परंतु आता विकासाच्या नावाखाली टक्केवारी व भ्रष्टाचाराचा कळस गाठला जात असून शहरात बोगस कामे भरपूर प्रमाणावर होत आहेत असे ते म्हणाले.या नवीन कार्यकारणी मध्ये सर्वसमावेशक शहर कार्यकारिणी केली असून शहराला काँग्रेस पक्षाचे व डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विचाराचे वैभव प्राप्त करण्यासाठी येणाऱ्या आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत मोठया प्रमाणात मताधिक्य देऊन नगरपरिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवावा असे ते म्हणाले. यावेळी शहरातून निवड झालेले उपाध्यक्ष दत्ता कोराळे,हमीद शेख,मेनुद्दीन मनियार,वीरभद्र आग्रे,राजकुमार चिकराळे,विलास सूर्यवंशी, अमित नितनवरे,सचिन आर्य, सुदाम सलघंटे, एड.प्रवीण भोसले,शिवाजी जाधव, प्रा.रवी मोरे,बालाजी शिंदे,शार्दुल पठाण, एड.विक्रांत सूर्यवंशी, रणजीत सुरवसे, दीपक चोपणे व सरचिटणीस म्हणून सईद शेख,नवनाथ कुदुंबळे,हबीब चौधरी,यासीन मणियार,वसीम अत्तार,अजय कांबळे,जुनेद देशमुख,नागनाथ घोलप,गोविंद पेटकर,रोहन सुरवसे,दीपक नाईक,समद शेख,आणि सचिव म्हणून सुनील वंजारवडे, तुषार सोमवंशी, चांद खुरेशी, बालाजी जाधव,मेहराज कादरी,नामदेव कटके, दत्ता सातपुते, श्रीधर कांबळे,शंकर नाईकवाडे,संजय मोघे,नंदकुमार कमले,भगवान पेठकर यांची निवड करण्यात आली.तसेच शहर काँग्रेस कार्यकारिणीत सल्लागार म्हणून ऍड.राघवेंद्र कांतराव कुलकर्णी, सतीश अनंतराव सबनीस व कोषाध्यक्ष म्हणून लक्ष्मीकांत सोमानी ,संघटक पदी समीर खतीब व इतर कार्यकारणी सदस्य म्हणून शरद वाडीकर,सोमनाथ धर्मशेट्टी, महेश शेटकार,बालाजी कांबळे,शफिक शेख इत्यादींची व्यापक पद्धतीने शहरांमध्ये निवड करण्यात आली.सदरील शहरातील कार्यकारिणी ही मतदारांची व्याप्ती पाहता व बूथसंख्या वाढल्यामुळे पूर्व,पश्चिम,दक्षिण,मध्य विभाग उत्तर असे पाच विभागांमध्ये वर्गीकरण करून त्या प्रत्येक विभागात एकेक पदाधिकारी नेमण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.दयानंद चोपणे यांनी पक्षाची विचारधारा मांडली व आभार प्रदर्शन हमीद शेख यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed