निलंगा ;-माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यातील सहा हजार कारसेवकाना अयोध्येला नेण्याचा संकल्प केला आहे ते कोणतेही काम करण्याचा संकल्प करतात तेंव्हा तो पूर्णत्वास नेतातच असा लातूर जिल्ह्यात त्यांच्या सारखा मोठया मनाचा दुसरा नेता नाही असे गौरव उद्गार काढून म्हणाले अयोध्या येथे भगवान अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला आहे. त्याचाच धागा पकडून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जिल्हा राममय केला आहे असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले
दि 22 जानेवारी रोजी निलंगा येथील निलकंठेश्वर मंदिरात अयोध्या येथे श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रामकथा व कारसेवकांचा सत्कार व समारोपांची आरती मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ठेवण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते
यावेळी माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर आक्का माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर,युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे ,निराधार कमिटीचे अध्यक्ष, शेषेराव ममाळे, प्रल्हाद बाहेती,अंकुश ढेरे,सुधीर पाटील दगडू सोळुंके, उपस्थित होते
पुढे बोलताना मंत्री संजय बनसोडे म्हणाले अक्का फाउंडेशन च्या वतीने जिल्ह्यात आरोग्य सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय काम असून त्यांच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. मंत्री बनसोडे आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना म्हणाले गेल्या वेळेपेक्षा यावेळी महाराष्ट्रात सर्वाधिक मताने लातूर लोकसभेची सीट निवडून आणून दाखवू असा निर्धार व्यक्त करून म्हणाले गेल्या वेळेस संभाजीराव आणि अरविंद पाटील होते यावेळी आम्ही तिघेजण आहोत त्यामुळे लोकसभा सीट सर्वाधिक मतांनी निवडून येणारच
माजी मंत्री आमदार संभारीराव निलंगेकर यांनी सहा हजार कारसेवकाना अयोध्येला घेऊन जाण्याचा निर्धार केला आहे ते नेणारच कारण त्यांची नियत साफ आहे. त्यांचाकडे व्हिजन आहे. ते मला कोणत्याही कामाची सूचना देतात त्याप्रमाणे काम करतो
संभाजी भैयासाठी गुड न्यूज येणार …
मंत्री संजय बनसोडे म्हणाले माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या साठी एक अति म्हत्वाची गुड न्युज लवकरात लवकर येणार आहे, असें म्हणाले पण त्यांनी त्या गुड न्युजचा उलघडा केला नाही ती गुलदस्त्यातच ठेवल्यामुळे सर्वानाच आता त्या गुड न्युजची उत्सुकता लागली आहे.
अरविंद पाटील यांनी नियोजनात न रहाता मोठ्या पदावर जावे…
युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर याना मी गेल्या 20 वर्षा पासून जवळून ओळखतो त्यांच्या कामाची पद्धत अतिशय वाखाणण्यासारखी आहे ,पक्ष संघटन ,खासदार, आमदार , कसे निवडून आणायचे व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्याला निवडून कसे आणायचे त्यांना कळते त्या प्रमाणे नियोजन लावून निवडून आणतात अरविंद भैय्या म्हणजे संभाजी भैयाना लक्ष्मणा सारखा भाऊ असल्यामुळे तालुक्यात मतदार संघात अडकून पडण्याची गरज नाही, त्यामुळे तर आज ते संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण करीत आहेत, कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन अरविंद भैय्या अतिशय कुशल करतात पण आता नियोजनात न रहाता मोठ्या पदावर जावे असा सल्ला शेवटी मंत्री संजय बनसोडे यांनी दिला
आज नव्या युगाची व पर्वाची सुरुवात
शतकानुशतके भारतीयांच्या सांस्कृतिक चेतनेत वसलेली अयोध्या, आज इतिहास घडविण्यास सज्ज झाली आहे. भगवान श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा या पावन पर्वावर श्रीराम मंदिराचे प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते झाले आहे. खऱ्या अर्थाने आज नव्या युगाची व पर्वाची सुरुवात झाली आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले
पुढे बोलताना आमदार निलंगेकर म्हणाले सहा हजार कारसेवकाना आपण अयोध्येला घेऊन जाणार आहोत कार सेवक नसेल तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांला घेऊन जाणार आहोत कारण प्रतिकूल परिस्थितीत अयोध्येला जाऊन लढा दिला आहे, त्यांच्या कार्याचे कौतुक करील तेवढे थोडे आहे, ते या सन्मानाचे खरे हक्कदार आहेत त्यांचा त्याग समर्पण आपण विसरू शकत नाही,पुढे बोलताना म्हणाले, खरो खरच आपली पिढी भाग्यवान आहे ,गेल्या पाचशे वर्षात प्रभू रामचंद्रांचे मंदिर झाले नाही ते भव्य दिव्य मंदिर पहाण्याचे भाग्य आपणाला लाभले आहे, आज खऱ्या अर्थाने भारत हिंदू राष्ट्र म्हणायला हरकत नाही ज्यांनी ज्यांनी हा दिवस पहिला तो भाग्यवान आहे.आक्कानी प्रत्येक राम भक्ता साठी व घरासाठी बुंदीच्या लाडूचा प्रसाद बनविला तर तो बनवित असताना राम राम म्हणत बनविला प्रत्येक महिलांना देखील रामभक्ती करीत बनविण्यास सांगितले ,
रामयनाचार्य हभप रुक्मिणताई हावरे यांच्या राम कथेला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती पुरुषाची नव्हती,पण खऱ्या अर्थाने रामकथेची गरज पुरुषांना आहे,
निलंग्यात भव्य राम मंदिर बांधणार…
निलंगा येथील राम मंदिराच्या जागेवर भव्य दिव्य असे श्रीराम मंदिर आगामी काळात बांधण्याचा संकल्प माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेवटी बोलून दाखविला
हभ प रामायणाचार्य साध्वी रुक्मिणीताई हावरे यांनी राम कथा यांनी गेली पाच दिवस अतिशय चांगल्या प्रकारे रामकथा सांगितली आणि उपस्थित श्रोत्यांचे मने जिंकले त्यांचा सत्कार मंत्री संजय बनसोडे यांनी केला
