लातूर -समस्त विश्वाच्या कल्याणासाठी,सहिष्णुतेची आणि बंधुभाव जपण्याची आपल्या सर्वांना शिकवण देणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची आज अयोध्येत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून त्या निमीत्ताने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात श्री प्रभुरामाची मनोभावे पूजा सोमवारी बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव यांच्या हस्ते करण्यात आली

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ बँकेच्या संचालिका सौ स्वयंप्रभाताई पाटील, संचालिका सौ अनिताताई केंद्रे, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव, बँकेचे उपसर व्यवस्थापक बी. व्ही. पवार, बँकेचे विविध खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी महिला अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्री प्रभुरामाची पूजा झाल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले