• Sat. May 3rd, 2025

देशभरातून हज यात्रेसाठी एक लाख 60 हजार अर्ज

Byjantaadmin

Jan 16, 2024

MUMBAI हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सोमवार (ता.१५) शेवटची मुदत होती. मुदत अखेर देशातून १ लाख ६० हजार तर राज्यभरातून २४ हजार ९३५ अर्ज भाविकांनी दाखल केले आहे.दरवर्षी मुस्लिम बांधवांसाठी हज कमिटीतर्फे यात्रेचे आयोजन केले जाते. देशभरातून लाखाच्या संख्येने भाविक यात्रेस जात असतात. यंदाच्या HAJ 2024 निमित्ताने देशासाठी १ लाख ७५ हजारांचा कोटा देण्यात आला आहे.

Haj Committee of India Opens Applications for Haj 2024 Under New Policy

अर्ज करण्यासाठी हज कमिटीतर्फे प्रथम बुधवार २० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. भाविकांच्या मागणीनुसार अर्ज करण्यासाठी मुदत वाढविण्यात आली होती. सुमारे २५ दिवसांची मुदत वाढ देण्यात आली होती.सोमवार (ता.१५) भाविकांना अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. मुदत अखेर देशभरातून १ लाख ६० हजार तर राज्यातून २४ हजार ९३५ अर्ज अर्ज दाखल झाले आहेत. तर मालेगाव येथून १ हजार ३०० असे भाविकांचा यात समावेश आहे.त्यात राज्यातील मेहरम नसलेले १०६ महिला भाविक यांच्यासह ७० वर्षापेक्षा अधिक वय असलेले १ हजार १०६ भाविकांसह अन्य २३ हजार ५५४ भाविकांनी अर्ज दाखल केल्याची माहिती कमिटीच्या सदस्यांकडून देण्यात आली.येत्या काही दिवसात छाननी होऊन जानेवारी अखेरीस अथवा फेब्रुवारीच्या सुरवातीस लकी ड्रॉ होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.”मुंबई विमानतळावरून हज यात्रेस जाण्यास कमी खर्च लागतो. त्यामुळे मुंबई येथून २२ हजार ६२८, नागपुरमधून १ हजार १३१, औरंगाबाद येथून १०६ भाविकांनी तर नांदेड, बीड, उस्मानाबाद भागातून ८६९ भाविकांनी हैदराबाद येथून अर्ज केले आहे.”

स्मृती इराणींच्या मदिना भेटीनंतर भारत अन् सऊदी अरब यांच्यात मोठा करार, यात्रेकरूंचा कोटा निश्चित

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी काल 9-1-24 (सोमवार) भारतीय हज यात्रेकरूंना मदत करणाऱ्या भारतीय स्वयंसेवकांची भेट घेतली. तसेच त्यांनी इस्लामच्या पवित्र शहरांपैकी एक असलेल्या मदिनालाही भेट दिली.सौदी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने इराणी यांनी 09/01/2024 (सोमवार) मदिना, माउंट उहुद आणि प्रेषित अल-मशीद अल-नबावी यांना इस्लामच्या पहिल्या क्यूबन मशिदीबाहेर भेट दिली. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ही सर्व ठिकाणे इस्लामिक इतिहासाच्या सुरुवातीच्या टप्प्याशी जोडलेली आहेत, आमच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ते प्रकाश टाकतात, असे स्मृती इराणी म्हणाल्या.

स्मृती इराणी आणि त्यांच्या शिष्टमंडळाने गेल्या वर्षी हज यात्रेदरम्यान भारतीयांची निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या भारतीय स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतातून उमराहला जाणाऱ्या यात्रेकरूंशी देखील संवाद साधला.  पुढील वर्षी भारतातून हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी त्यांची सौदी भेट उपयुक्त ठरेल, असे इराणी म्हणाले. हे त्यांना आवश्यक माहिती प्रदान करण्यात मदत करेल. हज यात्रेला जाणाऱ्या भारतीय मुस्लिमांना सुविधा आणि सेवा देण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध असे देखील स्मृती इराणी यांनी स्पष्ट केले. मदिनाच्या भेटीनंतर उहुद पर्वत आणि कुबा मशिदीला भेट दिली. मशीद ही इस्लामची पहिली मशीद आहे तर उहुद पर्वत हे अनेक आरंभीच्या इस्लामी शहीदांचे अंतिम विश्रामस्थान आहे, असे अल्पसंख्याक मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.  भारत आणि KSA (Kingdom of Saudi Arabia) यांच्यात द्विपक्षीय हज करार 2024 वर स्वाक्षरी करण्यात आली. करारानुसार, हज 2024 साठी भारतातील एकूण 1,75,025 यात्रेकरूंचा कोटा निश्चित करण्यात आला.ज्यात 1,40,020 जागा हज समितीमार्फत जाणाऱ्यांसाठी राखीव आहेत आणि अतिरिक्त 35,005 यात्रेकरूंना खाजगी ऑपरेटरद्वारे या यात्रेस जाता येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *