• Sat. May 3rd, 2025

राहुल गांधींची मोठी घोषणा; अयोध्येच्या राम मंदिराच्या कार्यक्रमाला जाणार की नाही?

Byjantaadmin

Jan 16, 2024

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या कार्यक्रमाला राहुल गांधी हजर राहणार की नाही याबद्दल त्यांनी मोठी घोषणा केली आहे. अयोध्येत होणारा 22 तारखेचा कार्यक्रम हा मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राजकीय कार्यक्रम केला असल्याने आपण त्या ठिकाणी जाणार नसल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमाला जाणार ज्याला जायचं आहे त्याने जावं असंही ते म्हणाले. या आधी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही अयोध्येच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात झाली आहे. ही यात्रा नागालँडमधील कोहिमा या ठिकाणी पोहोचली आहे. त्यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, हिंदू धर्मातील महत्त्वाच्या लोकांनीही राम मंदिराच्या उद्घाटनाशी संबंधित कार्यक्रमाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. हा कार्यक्रम धार्मिक राहिला नसून निवडणुकीशी संबंधित झाला आहे. अशा स्थितीत काँग्रेस अध्यक्षांनी न जाण्याचा र्णय घेतला आहे. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. मात्र आमच्या पक्ष आणि आघाडीतील ज्यांना जायचे आहे ते तिथे जाऊ शकतात काँग्रेसची न्याय यात्रा अयोध्येच्या मार्गात नाही. त्यामुळे आपण या यात्रेवरच भर देणार असून अयोध्येला जाणार नसल्याचं राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi on Ram Lala Pran Pratishtha congress mp will not attend ayodhya ram mandir programme marathi news  Rahul Gandhi : सोनियांचा नकार, राहुल गांधींची मोठी घोषणा; अयोध्येच्या राम मंदिराच्या कार्यक्रमाला जाणार की नाही? 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *