• Sat. May 3rd, 2025

मनोज जरांगेंना मुंबईत येण्याची वेळच येणार नाही!

Byjantaadmin

Jan 16, 2024

(Maratha Reservation) मागणीसाठी(Manoj Jarange)  मुंबई आंदोलनावर ठाम असल्याने, आता सरकारकडून देखील त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही. राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे.  मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची एका मंत्र्यांची एबीपी माझाला एका मंत्र्याने माहिती दिली. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना मुंबई त येण्याची वेळ येणार नाही सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेणार आहे. आमदार बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे घेणार भेट घेणार आहे. काल जरांगे आणि बच्चू कडूंच्या बैठकीचा तपशील मुख्यमंत्र्यांकडे सादर केलाय. त्यानंतर सरकारच्या मंत्र्यांमध्ये चर्चा झाली आणि नंतर नवीन ड्राफ्ट तयार करण्यात आला. हा ड्राफ्ट घेऊन दोघे जण आज मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेणार आहे.

 

Manoj Jarange will not come to Mumbai Efforts on war level under the leadership of Chief Minister, ABP Majha Exclusive मनोज जरांगेंना मुंबईत येण्याची वेळच येणार नाही!  मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू, मंत्र्यांची Exclusive माहिती

महायुतीत सर्वच काही आलबेल नाही

महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवार गटामुळे सहकारी पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. गेल्या काही दिवसात बच्चू कडू यांचे स्टेटमेंट देखील महायुतीत सर्वच काही आलबेल नाही हेच दाखवत आहेत. त्यामुळे स्वअस्तित्व दाखवण्यासाठी हा दबाव निर्माण करण्याचे हे चर्चेचे परिश्रम घेतले गेले का ? हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.

मराठा समन्वयकांचं नाव न घेता जरांगे यांची टीका 

माझ्यावर ट्रॅप लावला जातोय असा गंभीर आरोप मनोज जरांगेनी सरकारवर केला आहे. सरकार खूप मोठे षडयंत्र रचणार आहे याची मला खात्रीलायक माहिती आहे. मनोज जरांगे यांची मराठा समन्वयकांवरती नाव न घेता गंभीर टीका केली आहे. मराठा समाजाच्या नावावर, जीवावर , राजकारण करणारे,मोठे झालेले अशा काही असंतुष्ट आत्म्यांना आरक्षण विषय कायमचा संपून द्यायचा नव्हता.  त्यांना मी आतून खपत नाही अशा लोकांना सरकार हाताशी धरत आहे. सरकारने काही मंत्र्यांनी त्यांना हाताशी धरले आहे. काही मराठा समन्वयकांचं नाव न घेता जरांगे यांची टीका केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *