सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या सभेदिवशी श्रमदान करणाऱ्या नगरपालिका कर्मचारी ४० महिलांना साड्या वाटप
निलंगा/प्रतिनिधी जिजाऊ जयंती दिनी निलंगा येथील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेदिवशी व दुसऱ्या दिवशी साफसफाई करणाऱ्या नगर पालिकेच्या ४० महिलांना सकल मराठा समाजाच्या वतीने साड्या वाटप करण्यात आल्या आहेत. 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या ४२६ व्या जयंतीदिचे औचित्य साधून जिजाऊ सृष्टी निलंगा येथे ज्या महिलांनी निलंगा येथे ९ डिसेंबर रोजी झालेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या ठिकाणी नगर परिषद निलंगा येथील स्वच्छता कामगार महिलांनी अतिशय उत्कृष्ट साफसफाई मोहीम यशस्वी राबवली होती त्यांचा सन्मान म्हणून सकल मराठा समाज निलंगा च्या वतीने साडी चोळी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य भागावतराव पौळ तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा संभाजी नवघरे, जाधव बालाजी,मोरे किसन,जाधव एम एम,विशाल जोळदापके ,पाटील ईश्वर,जाधव ज्ञानेश्वर,उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाधव एम एम यांनी केले , सुत्रसंचालन उत्तम शेळके,तर आभार जाधव अनिल यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद सोनवणे, प्रदीप सावरे, सचिन धुमाळ, प्रमोद कदम ,अमर पाटील,घोरपडे मोहन,नेलवाडे आर के,बरमदे डी बी,अर्चना जाधव,इंगळे वैशाली,रंजना जाधव,राजश्री शिंदे, सुनीता बरमदे यांनी प्रयत्न केले.